
विदर्भ तेली महासंघाची 16 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक
नागपूर: विदर्भ तेली महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय विदर्भ दौरा “संवाद यात्रा” अनुभव संकलन पुस्तिकेचे विमोचन विशेष महत्त्वपूर्ण बैठक येत्या रविवारी दिनांक 16 जुलै 2023 रोजी, सकाळी 11 वाजता. सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक नागपूर येथे आयोजित केले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथजी शेंडे यांची प्रमुख उपस्थितीत प्रथम सत्र 11 ते दुपारी 1 पर्यंत आणि द्वितीय सत्र त्याच दिवशी दुपारी 1: 30 ते 4 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला आपण सर्व समाज बंधूनी सहपरिवारासह, मित्रमंडळी व समाज बंधू भगिनींनी, उपस्थितीत राहावे. विदर्भ तेली समाज महासंघतर्फे या परिषदेमध्ये सहा प्रकारच्या मागण्या मान्य कराव्या. असेही यावेळी सांगितले आहे. असे आवाहन प्रा. रमेश पिसे आणि सचिव संजय सोनटक्के यांनी पत्रपरिषदेमध्ये केले आहे.
विदर्भ तेली समाज महासंघातर्फे पत्रपरिषद संबोधित करतेवेळी प्रा. रमेश पिसे, संजय शेंन्डे, कृष्णाजी बेले, संजय सोनटक्के, राजेंद्र टेकाडे, मिरा मदनकर यांची उपस्थिति होती.