
सूर तेच छेडिता
स्वप्न तुझे हे मोरपंखी
पडती मन आकाशी
प्रितीचे शित चांदणे
दिसती तुझ्या बाहुशी
हृदयाच्या या विणेवरी
सूर तेच छेडिता
जुनेच गित उमलले
भाव नव्याने मांडता
नजरा नजर होता ही
लोचने ती लाजती
गुलाब कळ्या या ओठांच्या
मंद मंद हासती
ऐकून पैजणांचा नाद
तालात हरवूनी मी गातो
सूर तेच मी छेडिता
तुझ परतूनी नव्याने पाहतो
रुपाली म्हस्के मलोडे, गडचिरोली
======