
मनातला पाऊस
गार गार हवा अन
धुंद धुंद गारवा..
पावसात भिजताना
सख्या तू सोबत असावा..
चालत रहावे पावसात
हातात हात घेऊन..
तुझ्यासवे चिंब भिजावे
मंत्रमुग्ध दोघे होऊन..
मी तुला दाखवावी
झाडे वेली चिंब भिजलेली..
तू तर बघत रहावा मला
मी जणू पावसाने सजलेली..
पावसाचं पाणी झेलतांना
तुझ्यावर शिंपण व्हावं..
तुझाही भिजलेला चेहरा
माझ्या नजरेनी लाजावं..
आठवणीतला हा पाऊस
असाच बरसत रहावा..
पाणावलेल्या कडांना
पाण्याने लपवत रहावा..
प्रतिभा गौपाले नागपूर
=======