घुसमट नात्यांची

घुसमट नात्यांचीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“करती हातांचा पाळणा, मांडीची गादी,
माझा सर्व खाऊ, प्रिय आजी आजोबांसाठी,”

खरंच लहान मुलांच्या चिमुकल्या जगात लाडक्या आजी आजोबांचे स्थान सर्वप्रथम असते .त्यांना आजी आजोबा लाड पुरवण्यासाठी, गोष्टी सांगण्यासाठी, आई-बाबांच्या रागापासून वाचवण्यासाठी, प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आवश्यक असतात. त्यांना आजी आजोबा आपले संरक्षक वाटतात. आई-बाबांनी रागवले तर आजी आजोबा मध्येच बोलून नातवाची बाजू घेऊन आई-बाबांच्या रागापासून वाचवतात .आई-बाबा अनावश्यक हट्ट पुरवत नाही. तेव्हा नातवांच्या प्रेमापोटीआजी आजोबा ते लाड पुरवतात.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे नातवंडांची फार मज्जा होती. रात्री गोष्टी ऐकायला मिळत. लाड पुरविले जात. बालपणच नाही तर तारुण्यही त्यांच्या मायेच्या सावलीत वाढत असे. परंतु आज विभक्त कुटुंब व आधुनिकीकरणामुळे कुटुंबात आई-वडील व बहिणभाऊ एवढेच कुटुंब मुलांना माहीत असते. नोकरीनिमित्त दोन्ही आई-बाबा दिवसभर बाहेर असतात. रात्री उशिरा घरी परततात. तेही ऑफिसचे टेन्शन व थकलेले शरीर घेऊन. त्यामुळे मुलांशी वार्तालापास किंवा खेळण्यास त्यांच्याकडे वेळ नसतो .मुले दिवसभर टीव्ही चॅनल, कार्टून व सिनेमा पाहण्यात गर्क असतात. आधुनिकीकरणामुळे, डिजिटल युगामुळे आजची पिढी खूपच शार्प आहे.

आई-वडिलांना सोबत ठेवण्याचा कायदा असल्यामुळे, लोकलज्जेस्तव बळजबरीने सोबत ठेवतात. काही मुले आपल्या आई-वडिलांच्या प्रेमापोटी सोबत ठेवतात. सर्वच घरी अशी परिस्थिती असते असे नाही. दोन पिढीतील विचारांत फरक नेहमीच राहणार आहे. आणि सर्वांनाच त्या अवस्थेतून जावे लागणार आहे. मुलाला आई-वडील हवे असतात, नातवंडांना आजी-आजोबां, आजी आजोबांना नातवंड हवे असतात. आजी-आजोबांना नातवंडात रमणे आवडते. त्यांनाही आपले बालपण त्यांच्यामुळे जगता येते. मुलीला सुद्धा आपले आईबाप हवे असतात पण सुनेला सासुरवास करणारे, नेहमीच सूचना देणारे, सुनावणारे सासू सासरे नकोसे असतात.

अशा वेळी कुणाला बदलण्याची गरज आहे. वयस्कांना की तरुणांना. मला वाटतं दोघांनाही. जर थोडे एकमेकांना समजून घेतलं तर, ‘एकत्र नांदू सौख्यभरे.’ होईल. वयस्करांनी तरुणांच्या आधुनिक विचार पद्धतींशी जुळून घ्यावे. तर तरुणांनी घरातील वयस्कर वृद्धांना समजून घ्यावे. उतारवयाचा परिणाम समजून शुल्लक गोष्टींना प्राधान्य न देता त्याकडे दुर्लक्ष करावे. नोकरी करणाऱ्या दांपत्यांना तर आपल्या मुलांसाठी, घरात लक्ष ठेवण्यासाठी, काळजी घेण्यासाठी, प्रेमाच्या व हक्काच्या माणसांची आवश्यकता असते. नोकरी करणारे दोघेही असल्यानंतर मुलांना एकटे राहावे लागते. मनात असूनही मुलांची काळजी पाहिजे तशी घेता येत नाही. नोकरीला प्रथम प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे घरी वयस्कांची गरज असते. त्यासाठी आपल्या गरजेपोटी तरी वयस्कांशी जुळवून घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे एकत्र राहून एकमेकांचा आधार बनता येतो. अशा प्रकारे तरुणांनी विचार केला तर.. वयस्कांनी तरुणांशी जुळवून घेताना आपल्या वेळी त्या सुविधा नसल्यामुळे आपल्याला मिळू शकल्या नाहीत परंतु आज आहेत तर त्यांनी का उपभोगू नये?असा सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. सर्वांनाच तारुण्य आणि वार्धक्य, आई वडील आणि सासू-सासरे, आजी-आजोबा या भूमिका-भूमिकांतून जावे लागणारच आहे तेव्हा नात्यांची घुसमट होऊ न देता सर्वांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.

उमटती त्या खुणा अशा
नात्यांचे, पावलांचे, विचारांचे ठसे
कधी दाट ,कधी विरळ,
घेई मनाचा ठाव जसे||

उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles