गडचिरोली : एकुण 649 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0
119

गडचिरोली : आज जिल्हयात 243 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 158 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27978 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 25023 वर पोहचली. तसेच सद्या 2306 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 649 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय महिला नवेगाव ,गडचिरोली, 64 वर्षीय पुरुष आरमोरी, 57 वर्षीय पुरुष डेलोडा ता.आरमोरी, 55 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी, 58 वर्षीय पुरुष चालेवाडा ता. अहेरी, 50 वर्षीय पुरुष आरमोरी, 70 वर्षीय पुरुष खेडेगांव ता. कुरखेडा, 72 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष जीबगाव ता. सावली जि. चंद्रपूर,79 वर्षीय पुरुष नवेगाव,गडचिरोली, 1 नवजात शिशु वाको ,ता. कोरची जि. गडचिरोली, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.24 टक्के तर मृत्यू दर 2.32 टक्के झाला.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवीन 243 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 60, अहेरी तालुक्यातील 21, आरमोरी 20, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 29, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 06, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 31, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 26 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 20 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 158 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 101, अहेरी 07, आरमोरी 04, भामरागड 00, चामोर्शी 20, धानोरा 05, एटापल्ली 00, मुलचेरा 07, सिरोंचा 04, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 05 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here