२१ हजार ६५० रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

मनपा हद्दीत दोन लाख २३ हजार ८९४ जणांची कोव्हीड चाचणी; 

२ लाख ६४१ निगेटिव्ह

चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत २१ हजार ६५० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील वर्षभरात दोन लाख २५ हजार २७३ जणांनी कोव्हीड चाचणी केली. यात २ लाख ६४१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तर उर्वरित २४ हजार ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या  एक हजार ९८३ रुग्ण उपचार घेत आहेत.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मागील वर्षी २२ मार्च रोजी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका युद्धस्तरावर कार्य करीत आहे. उपासमारी होणा-या नागरिकांना जेवणाचे डब्बे, गरिबांना अन्नधान्य किट, दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात ७५० रुपये, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विलीगीकरण व्यवस्था, २५ लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी केंद्र सुरु केले. शहरच नव्हेतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोव्हीड केअर सेंटर सुरु केले. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वन अकादमी व सैनिकी शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. व आता मनपाचे स्वतंत्र आसरा कोव्हीड रुग्णालय सुद्धा सुरु झाले आहे.

राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटीजन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर कारवाई, व्यापक लसीकरण मोहीम यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटत आहे. शिवाय व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील कमी होत आहे. एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4468 इतकी होती. ती १९ मेपर्यंत एक हजार ९८३ पर्यंत कमी झाली आहे. दरम्यान, ३७२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात ५ मे रोजी गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या 2416 इतकी होती. १९ मे रोजी ती ९७४ पर्यंत कमी झाली आहे. यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही घटली आहे. खासगी मध्ये भरती संख्या ८५६, मनपा कोव्हीड केअर सेंटर मध्ये २५३ रुग्ण संख्या आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.

एप्रिलअखेर 14 हजार 328 रुग्ण बरे झाले होते. ही संख्या आज २१ हजार ६५० वर पोहचली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, वन अकॅडमी, सैनिक स्कुलच्या माध्यमातून रुग्णांना एक चांगली सुव्यवस्था आपण देऊ शकलो. तिथे सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्याचे काम महानगरपालिका करीत आहे. कोव्हीड रुग्णालयाच्या माध्यमातून सेवेतील एक उणीव भरून निघाली आहे. आता आपण कुठेही कमी नाही. सुसज्ज व सुव्यवस्थित हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी सुविधा  उपलब्ध असून, रुग्णांची कोणतीही गैरसोया होणार नाही, असा विश्वास महापौरांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles