
वीज पडून एकाचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात ही घटना घडली.
तेंदुपत्ता तोडून तो विक्रीसाठी नेत असताना वीज पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 19 मे रोज बुधवारला सायंकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्यात घडली. मृतकाचे नाव वसंत नामदेव सोनुले वय 52 असे असुन तो धानोरा तालुक्यातील चिचोली येथील रहिवासी आहे.
सद्या तेंदुसंकलनाचा सिझन आहे. सदर व्यक्ति एटापल्ली तालुक्यातील दिंडवी येथे आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. अरुण मोहूर्ले हे पण सोबतीला होते. तेंदुसंकलन करून दुपारच्या सुमारास 3 ते 3.30 वाजता तेेंदूची पाने फडी कडे नेत असताना दिंडवी जंगल परिसरात मोहाच्या झाडाजवळ वीज कोसळली त्यात वसंतचा जागेवरच मृत्यू झाला. सोबत असलेले दूर अंतरावर असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यांचा मृत देह शवविच्छेदन करण्यासाठी धानोरा येथे आणण्यात आला आहे. मृतक मजुरास तेंदु कंत्राटदार व शासनाकडून आर्थिक मदत व मदत देण्यात यावी.अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे.