अनलॉकबाबत गंभीरता ठेवा, कोरोनाबाबत खबरदारी आवश्यक, सर्वांनी लस टोचून घेण्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

कोरोना लसीबाबत अंधश्रद्धा नको, लस टोचून घ्या – मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन
गडचिरोली येथील सावरगाव उपकेंद्र, नवेगाव पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

गडचिरोली जिल्हयातील ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज आहेत, ते न बाळगता सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले मी कालच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला, मी आज तुमच्यासमोर आलो आहे. मला काहीही झाले नाही. सर्वांनी कोरोना लस घेतल्यास भविष्यात आपणाला मास्क घालायची गरजही नसेल. राज्यात शासनाने केलेल्या प्रयत्नामुळे आपणाला राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता आले आहे. राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असा गाफील राहता कामा नये. राज्यात हळुहळु अनलॉकची करण्यात येत असल्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनानी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशाचे पालन केल्यास निश्चितच कोरोना राज्यातून हद्दपार करता येईल. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता/शंका वर्तविण्यात येत आहे. त्यापासून आपणाला वाचायचे असेल तर सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खुप कमी होऊन जातो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी काळजी न करता, अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्या व आपला जीव वाचवा असे आवाहन त्यांनी सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणावेळी केले. ते गडचिरोली येथे नवेगाव ग्रामपंचायती अंतर्गत पाणी पुरवठा योजना व सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यासाठी आले होते.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पोरेटी पाटील, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ.मडावी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हयातील लसीकरण व आरोग्य सुविधांबाबत यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हयातील कोरोना स्थितीबाबत चर्चा करून कोरोना लसीकरणाबाबत गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी ‘लस टोचाल तर वाचाल’ असे मत व्यक्त केले. यातून त्यांनी कोरोना बाबतच्या लसीकरणाचे महत्व विशद केले. लसीकरण कमी प्रमाणात झाल्यामुळे अजूनही नागरिक कोरोना बाधित होत आहेत. तसेच काहिंना जीव गमवावा लागत आहे. हे जर टाळायचे असेल तर लसीकरण करावेच लागेल असे ते यावेळी म्हणाले.

आदिवासी बांधवांशी साधला संवाद

सावरगाव येथे काही घरांबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांशी त्यांनी गाडीतून उतरून संवाद साधला व समस्यांबाबत चर्चा केली. गावकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत अडचणी सांगितल्या व लगेच मंत्र्यांनी पाणी पुरवठा विभागाला समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना करणेबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांनी घरात जावून त्यांची विचारपूसही केली.

नवेगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

जल जीवन मिशन प्रकल्पांतर्गत नवेगाव-मुरखळा ग्रामपंचायतीमधी नव्याने बांधण्यात आलेल्या 3.5 लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लोकर्पण मंत्र्यांच्या हस्ते झाले. शहरा लगत असलेली व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. भविष्यात दरडोई पाणी पुरवठा वाढविण्याची आवश्यकता पडेल त्यासाठी आताच नियोजन करा व प्रस्ताव प्रशासनास सादर करा आपण लोकांना आवश्यक पाणी देवू असे आवश्वासन त्यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री महोदयांना स्थानिक सरपंच, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.तुरकर यांनी माहिती दिली.

पर्यावरण दिन केला साजरा

जागतिक पर्यावरण दिना निमित्त नवेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी वृक्षारोपण करून दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री श्री. वडेट्टीवार यांचे हस्ते व अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे हस्ते झाडे लावण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles