
राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले. यात हजारो नागरिकांचे कुटुंब उध्वस्त झाले. अनेकांना रोजगार गमवावे लागले, अनेकांचे रोजगार हिरावले गेले, लाकडाऊनमुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली. या काळात मात्र युवक काँग्रेसने केलेली जनतेची सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. मागील ५० दिवसांपासून युवक काँग्रेसनी चालवलेल्या रुग्णालयातील भोजन व्यवस्था, माझ्या वाढदिवसानिमित्ताने सुरू केलेल्या ‘सेवा सप्ताह’ यादरम्यान गरजू लोकांच्या अडचणीत धावून जाणारे खरे कोरोना योध्दा ही महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी करत आहे. तरुणांचे मनोबल आणि शाबासकी देण्यासाठी मी स्वत: गडचिरोलीत आलो. एक उत्तम काम युवक काँग्रेस माध्यमातून सुरू आहे. या तरुणांच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार, अशी ग्वाही यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मागील अनेक दिवसांपासून युवक काँग्रेस सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे, अनेक अडचणींवर मात करून जनतेच्या सेवेत खंड पडू दिला नाही, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ.अभिजित वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी आ. अविनाश वारजूरकर, माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनहोर पाटील पोरेटी, अतुल लोंढे, प्रसन्न तिडके, गिरीश पांडव, विनोद दत्तात्रय, रवींद्र दरेकर, डॉ. नितीन कोडवते, जेसाभाई मोटवानी, डॉ.चंदा कोडवते, महिला अध्यक्ष भावना वानखेडे, समशेर पठाण, नंदू वाईलकर, राकेश रत्नावार, जि.प.सदस्य कविता भगत, प्रमोद भगत, जितेंद्र मुनघाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते तर आभार प्रतीक बारसिंगे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, संजय चन्ने, घनश्याम मुरवतकर, तोफिक शेख, गौरव एनप्रेद्दीवार, विपुल एलेटीवार, वसंता राऊत, कुणाल ताजने, रवी गराडे, विनोद धदरें, दिलीप चौधरी, अपर्णा खेवले, रोहिणी मसराम, अनिकेत सदुकर, शैलेश टेकाम सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.