अल्प कालावधीत लोकप्रिय ठरली गडचिरोलीची संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, 16 जूनला तृतीय वर्धापनदिन

गडचिरोली जिल्ह्यातील नावाजलेल्या संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित गडचिरोलीचा तृतीय वर्धापन दिन बुधवार, 16 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 जून 2018 ला या सोसायटीची स्थापना झाली होती. संस्थापक अध्यक्ष मनीष फाये यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दमदार कामगिरी करीत तीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याबद्दल सर्वस्तरातून सोसायटीचे अभिनंदन केले जात आहे.

सोसायटीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त बुधवार, 16 जून रोजी दुपारी 1 वाजता सोसायटीच्या कुरखेडा येथील गांधी चौकातील संस्कार भवन येथील मुख्य कार्यालयात तसेच कोरची येथील श्रीराम विद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सकाळी 10.30 वाजता कोरची येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सभागृहात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक उत्कृष्ट कार्य पुरस्कार वितरण सोहळादेखील यावेळी पार पडणार आहे. सोबतच दुपारी 1 वाजता कोरची येथील श्रीराम विद्यालयाच्या सभागृहात सहकाररत्न पुरस्कार वितरण, तालुका वार्षिक उत्कृष्ट कार्य पुरस्कार वितरण, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मनीष फाये, उपाध्यक्ष चांगदेव फाये, संचालक नितीन कावळे, दीनदयाळ भट्टड, परसराम नाट, प्रशांत मोहूर्ले, हरीश टेलका, लक्ष्मण धुळसे, मंगेश मांडवे, चेतना कुंभलवार, मंगला वडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, मुख्य व्यवस्थापक दिवाकर देवांगण हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles