
गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ७०० धडक सिंचन विहीरीचे प्रलबिंत अनुदान संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान
विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस यांच्या सोबत नागपुरात चर्चा केली. यावेळी भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांची विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस यांच्या कडे लाभार्थी यांचे अनुदान देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातुन शासनाने धडक सिंचन विहिर योजना राबविली असुन या योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये कुरखेडा तालुक्यासह जिल्हातील एकुण १ हजार ७०० शेतकरी लाभार्थीचे सिंचन विहीर मंजुर करण्यात आले आहेत. मात्र अनेक महिण्याचा कालावधी लोटला तरी कुरखेडा तालुक्यातील १५१ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील एकुण १७०० लाभार्थी निधीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात कुरखेडा तालुक्यातील १५१आरमोरी १९७ गडचिरोली १९५ धानोरा १२१ कोरची ८० चामोर्शी ३०६मुलचेरा ५८ अहेरी १२९ एटापल्ली ९४भामरागड ४८ सिरोचा तालुक्यातील १९२ असे जिल्ह्यातील एकुण १७०० लाभार्थी यांचे पैसे प्रलबिंत आहेत.
त्यामुळे शेतकरी लाभार्थी यांना सिंचन विहिरीचे रखडलेले अनुदान त्वरीत देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेद्रजी फडणविस यांच्या सोबत चर्चा करुन मागणी केली.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष बबलु हुसैनी संदिपजी कोरेत आल्लापलीचे उपसरपंच विनोद आकनपल्लीवार सिंरोचा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी कुरखेडा तालुका अध्यक्ष नाजुक पुराम व भारतीय जनता पार्टीचे पदधिकारी उपस्थित होते.
नागपुर विभागातील गडचिरोली भंडारा गोंदिया व नागपुर या भुगर्भात पाण्याची अधिक उपलब्धता असुनही विहीरीची संख्या कमी असल्याने व सिंचनाची सुविधा कमी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने उपलब्ध पाण्याची पातळी लक्षात घेतासिंचन विहीराचा धडक कार्यक्रम मंजुर करण्यात आला.या अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील वडेगाव चिचेवाडातळेगाव भटेगाव खेडेगाव धमदीटोला देऊळगाव गोठणगाव पलसगड जांभुळखेडा वासी अरततोंडी गेवर्धा धानोरी येगलखेडा सिंदेसुंर मरार टोला खरमटोला वासी कढोली मौशी लेढारी शिरपुर लेढारी मालदुगी भटेगाव चारभट्टी कुंभीटोला नान्ही जांभळी बांधगाव शिवणी पुराडा सावलखेडा सोनेरांगी आंबेझरी खैरी सायगाव येरकडी उराडी कराडी वाघेडा घाटी मोहगाव वाकडी कराडी चांदागड आदी गावासह तालुक्यातील १५१ लाभार्थाना विहीर मंजुर करण्यात आले यापैकी फक्त ३८ विहिर पुर्ण झाले असुन जवळपास ११३ विहिरीचे काम सुरू होऊन अर्धवट आहेत .काही विहीर निधी अभावी सुरू करण्यात न आल्याचे चित्र आहे.अशीच परिस्थिती कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात असल्याचे दिसुन येत आहे.
या योजनेत अंतर्गत काही लार्भाचे अर्धे अनुदान दिले असुन मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभार्थीची निधी अप्राप्त आहे.
सदर अनुदान देण्यास दिंरगाई होत असल्याने लाभार्थी चिंतेत आहे. व वारंवार निधी करीता सिंचाई कार्यालय संबधित विभागाकडे चकरा मारत असुन आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुन सदर प्रश्नाकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असुन लाभार्थाना पैसे देण्यास दिंरगाई होत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन विहीरीचे रखडलेले अनुदान त्वरीत घ्यावे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणविस यांच्या कडे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी मागणी केली.