‘वाढदिवस’

*वाढदिवस*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आनंदी जीवन जगावे अंतर उजळून निघावे
जन्मदिवस आज तुमचा आयुष्यात तुम्हाला सुख लाभावे
कळस कीर्तीचा वाढूनी पुण्यवंत तुम्ही व्हावे…
आज ज्यांचा जन्मदिवस त्या सर्वांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पण तुम्हाला प्रश्न पडला असेल कुणाचा आहे बर आज वाढदिवस? मीच सांगते ज्यांना *आपला वाढदिवस माहीतच नाही, हे सुंदर आयुष्य आपल्याला लाभले त्याची सुरुवात कुठून झाली हेच ज्यांना माहीत नाही त्या सर्वांचा आज वाढदिवस म्हणूनच आपणच आपल्या संकल्पनेतून एक जून हा राष्ट्रीय वाढदिवस दिन
म्हणून साजरा करत असतो…
सर्वात जास्त वाढदिवस असणाऱ्या या दिवसाचे श्रेय जाते आपल्या प्राथमिक शिक्षकांना अगदी 1980 पर्यंत आपल्याकडे हे सर्व असं चाललेलं होतं त्या काळी जन्म नोंदीबाबत फारशी जनजागृती नव्हतीआणि *वाढदिवस साजरे करण्याचे फॅड आणि वेड ही नसल्याने मुलांना शाळेत नेल्यावर शिक्षक यांची जन्मतारीख ठरवत असत. त्यातली त्यात शाळेसाठी जून हे शैक्षणिक वर्ष… मग जूनमध्ये मुलाचे नविन वर्ष सूरु झाले म्हणजे पुढे शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही म्हणून मग एक जुन…

अर्थात त्यानंतर याच विषयावर आपल्याकडे बरेच उहापोह झाले. विनोदांना बहर आल. ते वेगळंच पण काही असो आज ज्यांचा शिक्षकांनी ठरवून दिलेल्या तारखेप्रमाणे वाढदिवस आहे त्यांचा व या आपल्या भारत देशात जगणं आणि मरणं,जन्म आणि मृत्यू* या संकल्पने पर्यंत जाऊन पोहोचलेला नाही असा ही समाज आहे. 1980 पूर्वीचीच जाऊ द्या… आजही अशी काही माणसं. अशी काही लेकर आहेत आणि तो ती काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नाही तर त्याहून अधिक आहे त्या सर्वांना आज जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
आणि म्हणूनच आपल्याकडे वाढदिवसाची संकल्पना समोर आली आहे..
माझा वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा करावा हे लहानपणी तर प्रत्येकालाच वाटत असतं दोस्त कंपनी मित्र-मैत्रिणी बोलवणं, केक कापण, पार्टी देण, शाळेत चॉकलेट वाटणं आणि असं बरंच काही.. मोठे झाल्यावर त्याचे स्वरूपही बदलत जातं आज काल तर यातून आपलं नाव मोठं करण्यासाठी असेल समाजसेवा समाज कार्य पुण्यकर्म व्हाव.म्हणूनही अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरे केले जाऊ लागले आहेत आणि मग
तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार
असा संगीतमय वाढदिवस गल्लीबोळातून गावात मिरवणुका काढून साजरा केला जातो..
तर काही मूठभर व्यक्ती अशाही आहेत
जन्म-मरण नको आता नको येरझार
नाम तुझे घेता देवा होई समाधान
असं म्हणून परमेश्वर नामस्मरणात
वाढदिवस साजरा करतात…

मी कुठेही कसाही असो प्रभू माझ्या मधे तू दिसो
सुख दुःखातून चालता मी
हसावे स्मरूनी तुला
जिंकूनी दुःखाला जो ऊठे तो प्रभू माझ्या नेत्री दिसो
असं म्हणत आपण आपला आणि इतरांचाही वाढदिवस साजरा करू
Happy Birthday to You
May God of Bless You
आणि हो आता मी जरा वेगळ्या विषयाकडे वळते कदाचित तुम्हाला ते रुचणारं, पटणारं न सेल पण मला असं वाटतं की वाढदिवस साजरा करताना ज्याचा वाढदिवस आहे त्याला आपण शुभेच्छा देतो पण *त्याला हे जग दाखवलं त्यांचं काय अरे त्या आई-वडिलांचा तर आयुष्यातला एक सुंदर अविस्मरणीय युगायुगांचा भरलेला आनंदाचा तो मेळा असतो..त्यांनाही या दिवशी कोणीतरी उपकृत करायला हवं ना.. त्या विचारांना तर कोणी विचारतच नाही उपकृत होणं तर लांबच… ज्यांना त्यांनी जन्माला घातलेलं असतं तेच विचारतात का हो आई-वडिलांना? ( अर्थात काही अपवाद असतीलही)
त्यांनाही घ्याना तुमच्या आनंदात सहभागी करून आणि त्यांनाही म्हणा..
तुम्ही हो माता पिता तुम्ही माझे सुखदाता
तुमच्यामुळे आलो मी जन्माला या जगता
सुखी ठेव देवराया माझ्या या माता पित्यास
आणि त्यांच्या काळजाचा तुकड्यासं
त्यावेळी आपसूकच हे जन्मदाते देवाला म्हणतील नको देवराया आता मग जन्म-मरण
माझ्या लेकराला सुखी ठेव हेच आमचे मागणे
अशी प्रार्थना . संपूर्ण जगताने तुमच्यासाठी दिलेल्या शुभेच्छा पेक्षा तुम्हाला लाखमोलाची वाटेल आणि निश्चितच *एक सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा आनंद तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही

आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे
अर्थात आपणच ठरवा आता कसा करायचा वाढदिवस??? आणि हो कसाही करा…आम्हा सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव राहो ईश्वरचरणी प्रार्थना.

सौ अनिता व्यवहारे
श्रीरामपूर जि अहमदनगर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles