पत्रकार परिषदेतच राजेश टिकैत यांच्यावर ‘शाईहल्ला’

पत्रकार परिषदेतच राजेश टिकैत यांच्यावर ‘शाईहल्ला’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बंगळुरू : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला असून एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली आहे. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून शाई फेकणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

स्थानिक माध्यमाने के चंद्रशेखर यांच्यावर स्टींग ऑपरेशन केले होते. यामध्ये चंद्रशेखरे यांनी बस स्ट्राईकच्या बदल्यात पैसे मागितले होते. या स्टींगमध्ये राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

याविषयी राकेश टिकैत यांना विचारले असता ते म्हणाले, माझे आणि चंद्रशेखर यांचे काहीही संबंध नाही. चंद्रशेखर फ्रॉड आहे, असे म्हणताच टिकैत यांच्यावर चंद्रशेखरच्या समर्थकांनी शाईफेक केली आहे. यानंतर टिकैत यांच्या समर्थकांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले. यावेळी टिकैत समर्थक आणि चंद्रशेखरच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रण मिळवले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राकेश टिकैत म्हणाले, यामागे सरकारचा हात आहे. ही सर्व जबाबदारी पोलिसांची असून कर्नाटक सरकारची ही मिलीभगत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, यावर आता सरकार काय कारवाई करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles