
महागाईचा रोष; हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने
नागपूर: जिल्ह्यातील मागेल त्या शेतकऱ्याला पीक कर्जाचे वाटप करा, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, रेशन मधून गव्हाचे वाटप पूर्ववत सुरू करा, वनाधिकार मिळालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना विनाअट पीककर्जाचे वाटप करा, आशाबाई अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा मागण्यांसाठी आज दि ३० मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. निदर्शनात भाऊ संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निदर्शकांना श्याम काळे व अरुण लाटकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की मोदी सरकार विकासाच्या नावावर जनतेची लूट करीत आहे. जिल्ह्यात फक्त दोन टक्के पीक कर्जाचे वाटप झालेले आहे. कोरोना महामारी च्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींचे नफे वाढवण्यासाठी मोदी सरकारने कार्य केले. तर दुसरीकडे जनतेचा असंतोष थांबवण्यासाठी मंदिर मशीद व इतर भावनात्मक मुद्द्यांचा खेळ संघ परिवाराने सुरू केला आहे. अशा मुद्द्यांना बळी न पडता जनतेने आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी एकजूट उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात अशोक आत्राम कैलास मडावी विलास शंकर देवानंद चौधरी मारुती बुंडे विजय वरखेडे, कांचन बोरकर पिंकी सवाईथूल अर्चना नरांजे, लक्ष्मी मोरे, गीता मेश्राम प्रीती मेश्राम राजेंद्र साठे यांनी सहभाग नोंदवला.