बिनापरवानगी रँली काढणे राणा दाम्पत्यांना भोवले

बिनापरवानगी रँली काढणे राणा दाम्पत्यांना भोवले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांवर गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी विना परवानगी राणा दांपत्यानी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री बारा वाजेपर्यंत विना परवानगी सुरु असणाऱ्या गोंधळामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा अमरावतीत परतले. यानंतर त्यांनी अमरावती शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचवटी चौकातून खुल्या जीपमधून भव्य मिरवणूक काढली.

राजकमल चौक येथे त्यांचे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. राजापेठ परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यानंतर शंकर नगर स्थित राणा यांच्या निवासस्थानी राणा दांपत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावून हा संपूर्ण गोंधळ सुरू असल्यामुळे नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी कलम 135 341 143 291 आणि 135 अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles