जोस्ट बटलरने शक्य ते सर्व पुरस्कार जिंकले पण…

जोस बटलरने शक्य ते सर्व पुरस्कार जिंकले पण…



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

यंदाच्या आयपीएलवर (IPL 2022) ज्या एका खेळाडूने आपली छाप सोडली तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बटलर (Jos Buttler). त्याने सर्वाधिक चार शतकांसह सर्वाधिक धावा केल्याबद्दल ऑरेंज कॅप जिंकली, तो प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट ठरला, सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकार त्याच्याच नावावर आहेत, केवळ विजेतेपदाची ट्रॉफीच त्याच्या हाती लागली नाही. ट्रॉफी सोडली तर त्याला शक्य इतर सर्व पुरस्कार त्यांने जिंकले.

असाच प्रकार २०१६ मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli in 2016 IPL) बाबत घडला होता. योगायोगाने त्यावर्षीसुध्दा आयपीएल फायनल २९ मे रोजीच खेळली गेली होती. त्यावर्षीसुध्दा विराटने सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक शतकं, प्लेयर ऑफ दी टूर्नांमेंट असे सर्व पुरस्कार जिंकले होते, त्याच्या बाबतीतसुध्दा केवळ ट्रॉफीचीच कमी राहिली होती.

ह्या दोन्ही मोसमात बटलर व कोहली ह्यांनी प्रत्येकी चार-चार शतकं झळकावताना अनुक्रमे 973 व 863 अशा सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण कोहलीचा संघ हा अंतिम सामन्यात सनराजयर्स कडून पराभूत झाला होता तर बटलरचा संघ गुजरात टायटन्सकडून पराभूत झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles