देशात लोकशाहीचे खरे स्तंभ तीनच; अरूण टिकेकर

देशात लोकशाहीचे खरे स्तंभ फक्त तीनच; अरूण टिकेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️रजत डेकाटे // नागपूर जिल्हा प्रतिनिधी

वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. मात्र ते खरे नसून लोकशाहीत फक्त, लोकसभा, न्यायपालिका व नोकरशाही हे तीनच स्तंभ मानले जातात. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी वृत्तपत्रापुढे एक ध्येय होते पण स्वातंत्र्य मिळताच ते ध्येय नष्ट झाले व वृत्तपत्राचे स्वरूप बदलून त्याचा व्यवसाय झाला, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी येथे व्यक्त केले.

वसईतील सहयोग संस्थेने दोन दिवस वसई साहित्य आणि कला महोत्सव भुईगाव डोंगरी येथे आयोजित केला होता. त्यावेळी टिकेकर यांच्याशी फा. फ्रान्सिस दिब्रिटो, मनोज आचार्य आणि प्रकाश आल्मेडा यांनी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, न्यायपालिकेवर टीका करण्याचा अधिकार संपादकाला आहे. फक्त त्याला आरोप करता येत नाहीत. संपादकांनी विवेकाचा शब्द हरवू नये व त्याने तटस्थपणे रहायला शिकले पाहिजे अशी भूमिका मी स्वत: स्वीकारली.

समाजाच्या वाईट प्रवृत्तीवर संपादकाने नेहमीच लिहावेच त्याचबरोबर चांगल्या गोष्टीही लोकांसमोर आणाव्यात, असे ते म्हणाले. या महोत्सवाच्या आरंभी गौतम बुद्धाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी लोककला अभ्यासकांचा मुक्त संवाद झाला. रविवारी सकाळी ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांच्या गप्पांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी टिकेकर यांनी, वृत्तपत्राच्या संपादकांनी स्वातंत्र्य मागण्यापेक्षा स्वातंत्र्य घ्यायचे असते शिवाय पगारा व्यतिरिक्त पैशाची हाव न ठेवली तर तो तटस्थपणे लिहू शकतो तसेच संपादक हा नेहमीच नि:पक्ष व उदारमतवादी असावा, असे उदगार काढले.

पहिल्या सत्रात हिंदी लेखिका सुधा अरोडा, लोककलेच्या अभ्यासक निर्मला डोसी आणि आयआयटीमधील तंत्रअधीक्षक व मुळात आदिवासी असलेले जनार्दन गौंड उपस्थित होते. गौंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देशातील छत्तीसगड येथील बस्तरच्या नक्षलवादाचे भीषण वास्तव उलगडून दाखवल्याने या विषयाच्या नाण्याची दुसरी बाजू श्रोत्यांना कळू शकली. मानवीय आधारावर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत नसल्याने देशातील जंगलात राहणाऱ्या आठ कोटी जनतेला नक्षलवादी ठरवून अतोनात छळ केला जातो व प्रसंगी त्यांची हत्याही केली जाते असे ते म्हणाले. देशात आजही अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे प्रश्न कसोशीने सोडवले जात नाहीत मात्र तेच सरकार सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा अधिकांश हिस्सा शस्त्र खरेदी करण्यासाठी वापरत आहेत. माध्यमात आदिवासींच्या प्रश्नांची चर्चाच होत नाही मग या देशावर त्यांनी प्रेम का करावे, असा प्रश्न त्यांनी केला. तर अरोडा म्हणाल्या की, संवेदनाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे कठीण झाले आहे. कलेचे बाजारीकरण झाल्यामुळे त्याचे साचे झाले आहेत व ते साहित्यातही घडत आहेत.

दिब्रिटो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत आयोजक सायमन मार्टिन यांनी केले. मनोज आचार्य यांनी प्रास्ताविक केले तर संगीता अरबुने यांनी आभार मानले. लेखक डॉ. नरेश भरडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles