
डाॅ.म.न.पोटभरे यांना देणार मानद डाॅक्टरेट
नागपूर: शहरातील पशुसंवर्धन खात्याचे सेवानिवृत्त सहआयुक्त आणि ज्येष्ठ पशुवैद्यक डाॅ. मधुकर नत्थुसा पोटभरे यांना डाॅक्टरेट अॉफ सोशल सायन्स (डी. एस. एससी.) या मानद उपाधीने गौरविण्यात येणार आहे.
अमरावतीच्या छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे, असे विद्यापीठाचे महासंचालक डाॅ. मंगेश देशमुख यांनी आज जाहीर केले. गेल्या 22 वर्षांतील ही सहावी मानद डाॅक्टरेट पदवी आहे. 2000 साली पहिली मानद उपाधी देशातील हरित क्रांतीचे प्रणेते डाॅ. स्वामीनाथन यांना देण्यात आली होती. याशिवाय विदर्भातून डाॅ. प्रकाश घवघवे यांनाही डी. एस. एससी. मिळाली आहे.
निवृत्तीनंतरच्या गेल्या तीन दशकांमध्ये गावोगावी जाऊन पशुधनविषयक मार्गदर्शन आणि समाजसेवेचे कार्य डाॅ. पोटभरे करीत असतात. आज वयाच्या 86 वर्षी सुद्धा ते “किसान से किसान तक” मोहिमेत हिरीरिने भाग घेत आहेत. त्यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्यावर शहरातील मित्रपरीवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.