Home ताज्या घटना नागपुरातील मानेवाडा रिंगरोडवर भरतोय ‘जीवघेणा’ बाजार

नागपुरातील मानेवाडा रिंगरोडवर भरतोय ‘जीवघेणा’ बाजार

346

नागपुरातील मानेवाडा रिंगरोडवर भरतोय ‘जीवघेणा’ बाजारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोड मार्गाच्या कडेला दर शनिवारी रात्रीचा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे दक्षिण नागपुरातील नागरिक या सततच्या ‘जीवघेण्या’ बाजाराला त्रस्त झालेली आहे.

छत्रपती रोड ते दिघोरी या मानेवडा रिंगरोडवर दररोज भरधाव वाहतूक नित्यनेमाने सुरू असते. रिंगरोड वर मोठ मोठे ट्रक धावतात, दिवसभर वर्दळ चालू राहते. यामध्ये जानकी नगर, सरस्वती नगर, अमरनगर, अध्यापक नगर, अंबिका नगर आणि उदयनगर या भागात वाहतुकीचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. दरम्यान कुठेही मनपाने सिग्नल लावले नसल्याने याठिकाणी त्वरीत सिग्नल लावण्याचीही मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

सत्यता पडताळली असता, रिंग रोड वरील फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते, असे अनेक दुकानदार रस्त्यावर आपले दुकान अवैधरित्या लावून बसतात. वस्तीतील नागरिक विक्रेत्यांकडे सामान घेण्याकरिता येवून वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि ट्राँफीक जाम होऊन अपघात होतात. या रस्त्यावर रोज ७ ते ९ या दरम्यान वाहतूक विस्कळीत होते. तसेच लहान सहान अपघातही होतात. यावर नागपूर मनपा व प्रशासनाने कारवाई करायली हवी अशी नागरिकांची मागणी आहे. कारण याठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. तेव्हा या ‘जीवघेण्या’ बाजाराचा त्वरीत प्रशासनाने बंदोबस्त करून नागरिकांना होणा-या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी करण्यात येत आहे.