अरब देशातील कचराकुंडीवर मोदींचा फोटो

अरब देशातील कचराकुंडीवर मोदींचा फोटो



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: भाजप (BJP) नेत्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. अरबच्या दुतावासाने भारताला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची हकालपट्टी करण्यात आली. नवीनकुमार जिंदाल यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परंतु, या दरम्यान आणखी वाद निर्माण झाला आहे. अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे आणखी राजकारण तापलं आहे.

अरब देशातील कचरा कुंड्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावल्याने चक्क काँग्रेसकडून (Congress) याबाबत ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये मोदींचे पोस्टर कचराकुंडीवर चिटकवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही टॅग केले आहे.

या ट्विटमध्ये सुरेंद्र राजपूत यांनी म्हटलं आहे की, “मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्विकार होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles