‘रणजितसिंहांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही’

‘रणजितसिंहांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सातारा: माझ्या बदनामी करण्यापाठीमागे रामराजेंचा हात आहे असा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर केला होता. याला रामराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देत खासदार रणजितसिंह यांच्यावर जोरदार टीका केली. ते रविवारी फलटणमध्ये वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी आले होते.

यावेळी रामराजे नाईक- निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.रणजीतसिंह निंबाळकरांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत. देशात आणि राज्यात काही घडलं तर शरद पवारांवर टीका होते. तर सातारा जिल्ह्यात काही जरी घडलं तरी माझ्यावरच टीका होते अशी परिस्थिती आहे . रणजीतसिंह निंबाळकर उच्च पातळीवर काम करतात. वृक्षारोपणापेक्षा त्यांना त्यांच्यावरचे आरोप महत्वाचे वाटत असतील. त्यांना खासदार म्हणून निवडून दिलय त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने का‌म करावं. त्यांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही. कोणामुळे पद मिळत नाही आणि जातही नाही. त्यांना अवास्तव महत्व देऊन त्यांचा टीआरपी राज्यात वाढवू नका, असे सांगत खासदार रणजितसिंहांनी मला खूप त्रास दिलाय असा आरोप सुद्धा रामराजेंनी केला.

२०२४ चा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल या धनंजय मुंडे यांच्या विधानावर नो कॉमेंटस असं बोलत रामराजे निंबाळकरांनी प्रश्नाला बगल दिली . गेल्या काही दिवसांपासुन दिगंबर आगवने यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर अपहराचे आरोप केले होते. या बदनामीच्या षडय‌ंत्राच्या पाठीमागे रामराजेच असल्याचा दावाही रणजितसिंहांनी केला होता.

दिगंबर आगवनेच्या पाठीमागून रामराजेच सगळी सूत्र हलवत असल्याचं रणजितसिंह यांच्यावतीने अनुप शहा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होते. यावरुनच रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचा समाचार घेतला. या सर्व प्रकरणात रामराजे निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर असा मोठा संघर्ष पहायला मिळणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles