विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, गृह विलगीकरणात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, गृह विलगीकरणात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वत: ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. शुक्रवारी फडणवीस लातूर दौऱ्यावर होते. तेथून ते सोलापूरलादेखील जाणार होते. मात्र, ताप आल्याने ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या ते गृह विलगीकरणात आहेत. दुसऱ्या लाटेतही त्यांना लागण झाली होती. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या ट्विटवर काळजी घ्या, लवकर आराम पडो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

*मतदानाचे काय ?*
फडणवीस १० जून रोजी राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान करू शकतील की नाही याबद्दल चर्चा सुरू आहे. नवीन नियमानुसार, तीन दिवसांनंतर त्यांची पुन्हा चाचणी होईल. यात ते निगेटिव्ह आले तर मतदान करता येऊ शकेल. अन्यथा निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल.

बॉलीवूडमध्येही कोरोना संसर्गामुळे नवी चिंता, आता शाहरुख खान आढळला पॉझिटिव्ह अभिनेता कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर आणि कॅटरिना कैफनंतर आता शाहरुख खानही कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. प्राप्त माहितीनुसार, शाहरुख सध्या ‘जवान’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तथापि, तो पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रीकरणाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. एक दिवसापूर्वी कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर कोविड पॉझिटिव्ह आले होते. निर्माता करण जौहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्यानंतर ५५ पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. या पार्टीत कॅटरिना, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, ऐश्वर्या राॅय आणि अभिषेक बच्चनसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles