पंकजा मुंडेचा पत्ता कट; ‘आम्ही कोरी पाकीटे’च; चंद्रकात पाटील

पंकजा मुंडेचा पत्ता कट; ‘आम्ही कोरी पाकीटे’च; चंद्रकात पाटील



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले. यंदाही त्यांच्या नावीची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही त्यांचा भाजपने रितसर पत्ता कट केला आहे. दरम्यान आता या सर्व प्रक्रियेवर भाजप नेते चंद्रकांत दादांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कोरी पाकीटं असतो. पक्ष जो निर्णय घेतो , तो आम्हा सर्वांना मान्य असतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती आशाही आता मावळली असल्याचे सिद्ध झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles