
अबबब!! ६० हजाराचा ‘कंडोम’
वेनेजुएला: जगाच्या पाठीवर दररोज आश्चर्यकारक घटना घडत असतात. काही लक्षात राहतात तर काहींचे अस्तित्व लवकरच शून्यात जमा होते. परंतु ‘ऐकावे ते नवलच’ असे काही भन्नाट घडले तर त्याबाबत आश्चर्य वाटते. दक्षिण अमेरिकामधील वेनेजुएला या देशात सोन्यापेक्षाही कंडोम महाग आहे. इथे गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी इतर गर्भनिरोधक उत्पादनांपेक्षा खूप जास्त आहे. या देशात कंडोमच्या एका पॅकेटासाठी तब्बल ६० हजार रुपये मोजावे लागतात.
अलीकडच्या काळात कंडोमच्या बाबतीत समाजामध्ये बऱ्यापैकी जागरूकता झालेली दिसून येते.आता पुरुषांप्रमाणे महिलाही मेडिकल शॉपमध्ये जाऊन कंडोमची मागणी करतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांनी स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेव्हरदेखील बाजारात आणलेले आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंडोम सारखी वस्तू एवढी महाग होऊनही लोक ती भरपूर खरेदी करतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची किंमत 5-7 हजार रुपये आहे. याशिवाय इतर उत्पादनेही खूप महाग आहेत. काळ्या बाजारात त्यांच्या किमती अधिक होतात.
दक्षिण अमेरिकेतील या देशात कोणत्याही परिस्थितीत गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे येथील लोक कंडोम खरेदी करताना अधिक दिसतात. त्यामुळे त्याच्या किंमतीत वाढ होत आहे. अर्थात देशाची अर्थव्यवस्था या उत्पादनाने अधिक सक्षम होत आहे.