Home नागपूर पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पवित्र दीक्षाभूमीत बोधीवृक्षाखाली धम्मपठण

पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पवित्र दीक्षाभूमीत बोधीवृक्षाखाली धम्मपठण

34

पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पवित्र
दीक्षाभूमीत बोधीवृक्षाखाली धम्मपठण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: जनसेवा प्रतिष्ठान, नागपूरच्या विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी परिसरातील बोधीवृक्षाखाली दि.14 जून 2022 रोजी पोर्णीमेनिमित्त धम्मपठन, बुध्द वंदना, बौध्द विधीनुसार धम्मदेसनेचा कार्यक्रम विलास गजघाटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

भन्ते सुगत बोधी, भन्ते रट्ठधम्म, भिक्षुणी विशाखा भिक्षुणी सुजाता, भिक्षूणी आम्रपाली, भिक्षूणी संघमित्रा, पाली भाषा व बौध्द धम्माच्या अभ्यासक वक्त्या तुलसा डोंगरे आणि भिक्षू गणाने धम्मपठन व धम्मदेसना दिली.

सम्राट अशोकाने ज्याप्रमाणे आपला मुलगा व मुलगी भारतात बौध्द धम्म प्रचार करण्यासाठी संघाला सोपविले तो त्याग संघाप्रति दानपरिणिता समाजामध्ये रूजणार नाही, तोपर्यंत बौध्द धम्माचा प्रसार प्रचार सुदृढ होणार नाही. बौध्द भिक्षू प्रशिक्षण केंद्र, धम्म मेळावे, बौध्द प्रचारक, बौध्द विहारातून समाजाला आर्थिक आणि सामाजिक मार्गदर्शन व्हावे, भिक्षू आणि भिक्षूणींकरीता वृध्दाश्रमाची व्यवस्था उभारणे, धम्मदीक्षेचे सोहळे, धम्मदीक्षेचे प्रमाणपत्र दीक्षाभूमीवर आयोजीत कार्यक्रम ही काळाची गरज आहे, असे वक्तव्य विलास गजघाटे यांनी आपल्या भाषणातून केले.

कार्यक्रमाला डॉ. सुधिर फुलझेले एन.आर. कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालन शरद मेश्राम यांनी केले. सुटे, संस्थेचे पदाधिकारी व गणेशराव तांबे, देवाजी रंगारी, सुशिल भोयर, सदानंद डोंगरे, पृथ्वीराज मोटघरे , राजकुमार वंजारी, श्रीमती मंदा वैरागडे, वर्षा मेश्राम, द्रौपदाबाई रामटेके, सौ . सुनंदा गजघाटे, डॉ. राजश्री गजघाटे, संघमित्रा जामगडे, ललीता मेश्राम, उषा जवादे, मनिषा रामटके, वर्षा देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे त्या हिन्दू मिल, मुंबईची जागा स्मारकाला द्यावी, अशी पहिली मागणी करणारे चंद्रकांत भंडारे यांचा याप्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उपस्थितांचे आभार मधुकर मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेकरिता खलिद खान, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरेश गेडाम, सुनिल काटकिले, मिलींद मुल यांनी अथक परिश्रम घेतलेत .