नागपुरात ईडी विरोधात कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
आर.पाटील, नागपूर
नागपूर: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्यापासून देशातील राजकारणात नवनव्या घडामोडी घडत आहेत. राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी (ED) चौकशी सुरु असून गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 30 तास चौकशी करण्यात आली आहे.
आज राज्याच्या उपराजधानीत राहुल गांधी यांच्या विरोधात राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू असल्याचा विरोध करण्यासाठी नागपूर कॉंग्रेसने मोर्चा, निदर्शने आयोजित केले होते. सुरूवातीला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली यावेळी युवक कॉंग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांनी पोलिसांचे बैरिकेट्स तोडून, जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. बैरीकेटकसवर चढून शेळके यांनी उडी घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शहरात कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे दिसताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस मुख्यालयात नेण्यात आले आहे.