हल्लेखोर आरोपीवर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा; श्याम चौधरी

हल्लेखोर आरोपीवर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा; श्याम चौधरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील हावरापेठ, भगवान नगर येथील रहिवाशी श्याम चौधरी यांच्यावर दि २६ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास मनोरूग्ण असलेल्या विठ्ठल गावंडे यांनी जीवे मारण्याच्या हेतूने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. यात श्याम चौधरी जखमी झाले असून त्यांना मुलगा व मित्राच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन उशीरा हल्लेखारास ३२४ कलम लावून अटक केली आणि लगेच जमानत करून सोडून देण्यात आले. यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून पोलीसांनी या आरोपीवर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज दि १७ जून रोजी आयोजित पत्र परीषदेत श्याम चौधरी राजेश रंगारी , यश चौधरी , सचिन भुंजग , अपेक्षित वाघ , सुरज येरमे , जितेंद्र , नरेंद्र आगलावे, प्रियांश शाहु , उत्कर्ष डोनाडकर आणि भाग्यश्री येरमे यांनी केली आहे.

आरोपी विठ्ठल गावंडे याने दारू पिऊन श्याम चौधरी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. पोलीसांनी आरोपीवर ३०७ कलमाखाली गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. परंतु आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये आधीच आर्थिक व्यव्हाराच्या जोरावर पोलीसांना ३२४ कलम लावून आरोपीला अभय दिले. आरोपीला वेळेवर अटक करून त्याचे मेडीकल सुध्दा पोलीसांनी केले नसल्याचे श्याम चौधरी यांनी सांगितले.

आरोपी विठ्ठल महादेवराव गावंडे हा नागपूर विद्यापीठ येथेन निवृत्त झाला असून निर्मल उज्वल क्रेडीट को. ऑप. सोसायटीचा संचालक मंडळावर आहे. आरोपीस दारूच्या व्यसनासह जुगार, लॉटरी याचा छंद असून विकृत मनोवृतीचा असल्याने त्याच्यावर ३२४ ऐवजी ३०७ कलम लावण्यात यावे अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles