एकनाथ शिंदेसह ११ आमदार ‘नॉट रिचेबल’; ठाकरे सरकार अडचणीत

एकनाथ शिंदेसह ११ आमदार ‘नॉट रिचेबल’; ठाकरे सरकार अडचणीत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिंदे भाजपात प्रवेश करणार_

सूरत: महाराष्ट्र राज्याचे शिवसेने ज्येष्ठ नेते आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेसह तब्बल ११ आमदार ‘नॉट रिचेबल’ असून ते सध्या गुजरातच्या सूरत येथील मेरिडीयम हॉटेलमध्ये स्थानबद्ध असल्याची सूत्राकडून माहिती प्राप्त होत असून, आज दुपारी शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून येत आहे.

काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे.

आज (मंगळवारी) दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातंय. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी ढवळाढवळ सुरू झाली आहे. दरम्यान बाळासाहेब थोरातही गटनेते पदाचा राजीनाम देणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles