Home ताज्या घटना भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा

भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा

104

भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील द्रौपदी मुर्मू _

नवी दिल्ली : सर्व शक्यतांना पूर्णविराम देत एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्या झारखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे.

मुर्मू यांच्या नावाची घोषणा करताना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पहिल्यांदाच एका महिला आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी आम्ही द्रौपदी मुर्मू यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करतो.

मूर्मू यांच्या नावाच्या घोषणेने गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपचे लक्ष आदिवासी समाजावर असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. देशाला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी आजपर्यंत देशात एकही आदिवासी राष्ट्रपती झालेला नाही.