
बौद्ध उपासिका सुमनबाई तुकाराम बागडेंना श्रद्धांजली
नागपूर:संघर्ष नायक नारायणराव बागडे यांच्या मातोश्रीचे निधन 22 जून रोजी झालेत. आज दि. 23 जून रोज गुरुवार ला अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळेस अनेक जनसमुदाय, आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने आंबेडकरी मोर्चेकरी लोक, वेगवेगळ्या स्तरावरून आलेले नेते, यावेळी उपस्थित होते.
श्रद्धांजली अर्पित करतांना शोकसभेत अँड. सुरेश घाटे, रविभाऊ शेन्डे, धनराज फुसे, तन्हा नागपुरी, गोरेजी, मामा मेश्राम आणि उपस्थित भन्तेजी यांनी नारायणराव बागडे यांच्या मातोश्री वर शोकसभेत आपले तनमनाने चांगले उच्च विचार मांडून यांनी सुमनताई बागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून आदरांजली देवून पुर्ण विराम दिला. याप्रसंगी अंबाझरी घाटावरील बौद्ध उपासक, उपासिका व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश दुपारे यांनी केले तर आभार नामदेवराव निकोसे यांनी मानले.