चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार गुवाहाटीत
_शिंदेगटात सहभागी झाल्याने ‘अबतक४२_
चंद्रपूर : महाविकास आघाडीला सुरूंग लावून शिवसेना हायजँक करणा-या बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटात आज अजून एक विदर्भातील अपक्ष आमदार थेट गुवाहाटीत पोहचून शिंदे गटात सामील झाल्याने एकनाथ शिंदे टीमचे संख्याबळ ‘अबतक ४२’ असे झाले आहे, म्हणजेच शिंदे गटाने जादुई आकडा पार केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महविकास आघाडीसोबत असलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी रात्री फोन आला होता. जोरगेवार शिंदे यांच्या संपर्कात होते. मतदार संघाचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे जोरगेवार यांनी काल यांनी प्रसार माध्यमास सांगितले होते. राज्यामध्ये राजकीय भूकंप सुरु असताना चंद्रपूर येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एवढेच नव्हे तर ते थेट गुवाहाटी येथे दाखल होऊन एकनाथ शिंदे यांची गुवाहाटी येथे भेट घेतली. गुवाहाटी हे आसाम राज्याच्या राजधानीचे शहर आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रपरिषदेत जोरगेवार यांचे नाव घेतल्यापासून ते चर्चेत आले आहे.