आमदारांच्या केसालाही धक्का लागला; तर घर गाठणे कठीण होईल; नारायण राणे

आमदारांच्या केसालाही धक्का लागला; तर घर गाठणे कठीण होईल; नारायण राणे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शरद पवार यांना धमकी दिली आहे. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल अशी धमकी नारायण राणे यांनी शरद पवारांना दिली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मुंबईत येऊद्या, त्यातले अनेक आमदार एकनाथ शिंदेंचा पाठिंबा काढून घेतील. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा केला. तेसच त्यांना मुंबईत तरी यावं लागेल, असे म्हटले होते. यानंतर नारायण राणे यांनी शरद पवार यांना थेट धमकी दिली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधाला आहे.

नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत. ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles