

जागतिक ऑलिंम्पिक दिन विभागीय क्रीडा संकुलात हर्षोल्लासात साजरा
_उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे समारोप व स्टार रेसलींग अकादमीचे खेळाडू व प्रशिक्षक निलेश राऊत सन्मानित_
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर:- क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग नागपूर उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दि. 28 एप्रिल 2022 ते 23 जून या कालावधीत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक ऑलिंम्पिक दिनाचे औचित्य साधून उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कुस्ती, ॲथलेटिक्स, स्केटिंग, कराटे, जिम्नॅस्टिक,टेबल टेनिस, आर्चरी, बॉक्सिंग, स्विमिंग, हॅण्डबोल, सॉफ्टबॉल, या खेळाचा समावेश करण्यात आला होता.
या प्रशिक्षण शिबिरात ज्या खेळाडूंनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले अशा खेळाडूंचा व त्याच्या प्रशिक्षकाचा प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान उपसंचालक शेखर पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये स्टार रेसलींग अकादमीचे प्रशिक्षक निलेश राऊत, अजय कांबळे टेबल टेनिस, ढोबळे सर स्केटिंग, रावत सर ॲथलेटिक्स, योगेश खोब्रागडे स्विमिंग, जिम्नॅस्टिक दारवनकर, बॉक्सिंग गणेश पुरोहित, कराटे झाकीर खान, हॅण्डबोल लांडगे मॅडम, सॉफ्टबॉल दर्शना पंडित या कर्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम दारवणकर, तर आभार भूषण कळमकर यांनी मानले.
उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले स्टार अकादमीचे खेळाडू प्रशिता जांभुलकर, समीक्षा कोचे, यश कोटांगळे, गणेश कोहळे, दिलीप इटनकर, डॉ.चंद्रशेखर गमे, उस्मान पठान यांनी स्टार अकादमीचे प्रशिक्षक निलेश राऊत व खेळाडू यांचे अभिनंदन केले.