
नृत्यबेला संगम, हा कथ्थक व व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम सोमवारी
_नागपूरकर अनुभवणार “नृत्यबेला संगम”_
नागपूर: शहरात येत्या सोमवारी, २७ जून रोजी, ‘कथक नृत्य मंदिर ‘ ‘नादब्रम्ह व्हायोलिन’ आणि ‘केशव नगर शाळा’ ह्यांचा संयुक्त विद्यमाने, ‘कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात’ येथे “नृत्यबेला संगम” हा कथ्थक व व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम संध्याकाळी ६:३० वा. आयोजित करण्यात आला आहे.
नागपूरातील प्रसिद्ध व्हायोलिन वादक, गुरु व ‘नादब्रम्ह व्हायोलिन’ चे संस्थापक, शिरीष भालेराव गेल्या २० वर्ष पासून व्हायोलिनचे शिक्षण देत आहेत. तसेच नागपूरातील प्रसिद्ध कथक नृत्यांगना, गुरु व ‘कथक नृत्य मंदिर’ च्या संस्थापिका , सौ, स्वाती भालेराव गेल्या २३ वर्ष पासून कथक नृत्यांगना घडविण्याचे काम करीत आहेत . ही वादक -नर्तकीची जोडी नागपूरकरांसाठी यंदा ‘नृत्य’ व ‘बेला’ (व्हायोलिन) ह्यांचा संगम असलेला “नृत्यबेला संगम” हा कार्यक्रम घेऊन आली आहे.
या कार्यक्रमात शास्त्रीय व उपशास्त्रीय व्हायोलिन वादन प्रस्तुत होणार असून कथक मध्ये वंदना, तराना, होरी, कजरी, अष्टपदी तसेच ताल रूपक व रास सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे आकर्षणाचे केंद्र ह्या दोन्ही गुरूंची जुगलबंदी ठरणार आहे. या कार्यक्रमात ८५ पेक्षा अधिक वादक व नृत्यांगनांचा समावेश असून वय वर्ष ५ ते ५० वयोगटातील हे कलाकार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क राहणार आहे. नागपूरकर रसिकांसाठी हा संगम अनुभवणे म्हणजे स्वर आणि तालाची अनोखी पर्वणीच ठरणार आहे.