नाम मे क्या रखा है जनाब.! कुछ भी बोल दो, बस जबान मिठी होनी चाहिए!

नाम मे क्या रखा है जनाब… कुछ भी बोल दो बस जबान मीठी होनी चाहिये….!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_यह पब्लिक है.. सब जानती है._

✍️संदिप नंदनवार/बिनधास्त

लाखनी: लाखनी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या नावाजलेले गाव पालांदूर हे तसे मोठे गाव. मात्र, गाव म्हटले की जवळपास लोकांची एकमेकांशी ओळख असते. मात्र त्यातही गावच्या स्वयंघोषित गावनेत्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे टोपण नावाने जनता ओळखू लागली आहे. त्यामुळे गावनेत्यांची ओळख पटविण्यासाठी टोपण नावाची खूणच कामी येते. ती सांगितल्याशिवाय नेमके कुण्या गावानेत्याबद्दल बोलतोय याचा नेमका व अचूक बोध होतो आहे.

यातून अनेक किस्से घडतात व कोरनासदृश्य परिस्थितीत टाळेबंदीच्या काळात पालांदूर परिसरात टोपण नाव हा विनोदी मनोरंजनाचा भाग बनला होता व तो आता पालांदूर परिसरात विनोदानेच चर्चिल्या जात आहे.
कुण्या एका शायरने म्हटले आहे, “नाम में क्या रखा है जनाब… कुछ भी बोल दो बस जबान मीठी होनी चाहिये…” पालांदूर हे लाखनी तालुक्यातील राजकीय हालचालीच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव. गावात विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, जिल्हा व राष्ट्रीयकृत बँका , पोलीस स्टेशन , तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय व बाजारपेठ आहे. तर गावच्यालगतच अड्याळ दिघोरी राज्य मार्गावर पालांदूरच्या परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातून वळसा देत चुलबंद नदी वाहते.

त्यामुळे पालांदूर परिसर चुलबंद खोरे म्हणूनही ओळखले जाते. गावाच्या इतिहासात निर्मल ग्राम पुरस्कार योजनेचे लाखाचे बक्षीस मिळाल्याची पालांदूर ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे. त्यापाठोपाठ नोकरदार व व्यापार करण्याची संख्या पालांदूर मध्ये व परिसरात खूप मोठी आहे.

मोठ्या लोकसंख्यामुळे व पंचक्रोशीत नावाजलेले गाव म्हणून पालांदूर व परिसरातील गावनेत्यांची ओळख आहे. गावानेत्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना गावातील व परिसरातील लोक झोलाछाप नेते, जलनेता, कुपावर झगडे लावणारा नेता, पोपटलाल नेता, नुकताच चर्चेत आलेला वसुलीकार पीठमांग्या गण्या, श्याटेलाइट नेता , बॕनरजीवी नेता, भूईमुसऱ्या नेता, अटेश्वर नेता, बाबूमामा नेता, जाडकातडीचा नेता, कन्नु नन्नू नेता, लपलप्या नेता, रामशास्त्री नेता, राजकीय बालगंधर्व नेता, मुकूरणारी हसणारा नेता, पाण्यासाठी लाचार नेता, नाईंटी नेता, दमटाक्या नेता , झलकाऱ्या नेता, फलफल्या नेता, भुईमुसऱ्या नेता, बॕनरजीवी नेता अश्या अनेक नानाविध टोपण नावांनी जनता ओळखते. या टोपण नावाने मुळे गावनेत्यांनी सत्तापद उपभोगून जी गाव विकासासाठी कामे केली व ही कामे करतांनी त्यात किती ‘मलाई’ खाल्ली यावरून अर्थात त्यांच्या कर्तृत्वावरुन(?) त्यांना ही परिसरातील जनतेने ओळख म्हणून टोपण नावे दिली आहेत. सर्व गावनेते कुण्या समारंभ अथवा कार्यक्रमानिमित्त एकत्र आले की तेही आता एकमेकांना याच टोपण नावाने हाक मारतात व आपला विनोदी मनोरंजनाचा कार्यक्रम आटोपून घेतात, असेही चित्र पालांदूर व परिसरात दिसून येत आहे.

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच , उपसरपंच, सदस्य ,पक्षाचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी असलेल्या अनेकांना त्यांच्या पदापेक्षा त्यांच्या टोपण नावानेच जनता पटकन ओळखते. कुणाची खोड म्हणून पडलेली टोपण नावे तर समोरासमोर कुणी गावनेता घेत नाही. याची जाण त्या गावानेत्यांनाही आहे. पण चुकून ते तोंडी आले, तर मग त्याचा राग निमूटपणे सहन करावा लागतो, काहींचे मस्करीत टोपण नाव पडले, त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. मुळातच आलरांऊडर स्वभावाच्या गावानेत्यांना यातून गावानेत्याच्या टोपण नावावरून हसू येत असेल तर उगाचच त्रागा कशाला करायचा, असेही वाटते.

नावात काय आहे… असे कुणी म्हटले असेलही, किंवा हिंदी चित्रपट ‘रोटी’ मधील ‘ऐ बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानती है, पब्लिक है… अजी अंदर क्या है, अजी बाहर क्या है, ये सब कुछ पहचानती है, पब्लिक है….’या गिताप्रमाणे सर्वसामान्य जनता या गावनेत्यांना टोपणनावाने ओळखू लागली आहे. याच टोपणामुळे पालांदूर परिसरातील जिल्हापरिषद निवडणूक गाजली यात शंका नाही हे ही एका गावनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे. आता ग्रामपंचायत गाजणार यात तिळमात्र शंका नाही असे नेहमी पक्ष बदलविणा-या गावनेत्याने म्हटल्याच्या चर्चा गावात रंगू लागल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles