तब्बल ६ लाख मतांनी हरलेल्या ‘इम्रान’वर कॉंग्रेस मेहरबान का?

६ लाख मतांनी हरलेल्या ‘इम्रान’वर कॉंग्रेस मेहरबान का?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पक्षश्रेष्ठीनी लिहले सोनिया गांधींना पत्र_

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :- इम्रान प्रतापगढी हे लोकसभेच्या निवडणुकीत मुरादाबाद येथून ६ लाख मतांनी हरल्यानंतरही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. अलीकडेच ते पक्षाशी जोडले गेले आहेत. आतापर्यंत एकही नगरपालिका निवडणूक जिंकली नाही. तरीही त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. एका व्यक्तीवर पक्षाची एवढी मेहरबानी का? यांच्या शायरीत इतकी खुबी आहे की अन्य योग्य नेत्यांच्या कतृत्वाचा विसर पडेल? असा सवाल राय यांनी विचारला आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा असंतोष आहे. काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारीवरून पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी तर सरळ काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. याआधी पवन खेडा, नगमा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराजी दर्शवली आहे.

काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राच्या कोट्यातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिल्लीत बोझा-बिस्तरा उचलणाऱ्यांना मुख्यपदावर नियुक्त केले जाते.

ते पत्रात लिहितात की, अशाचप्रकारे पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धूला प्रदेशाध्यक्ष बनवण्याची चूक केली होती. सिद्धूही इम्रानप्रमाणे शायरी करत होते. पक्षाचे पद मिळवण्यासाठी शायरी येणे आवश्यक आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेते अपमानित होत आहेत. आता पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे पाहत नाहीत अशी टीका त्यांनी केली.

*आशिष देशमुख यांचा राजीनामा*

राज्यसभा उमेदवारीत शब्द न पाळल्याने नाराज झालेले डॉ. आशिष देशमुख काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिला. तरी पक्षात राहून काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अनेक सक्षम उमेदवार असताना पक्षाने राज्याबाहेरचा उमेदवार दिल्याने ही नाराजी आहे. भाजपातून बाहेर पडल्यानंतर देशमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी त्यांनी आमदारकीही पणाला लावली. खुद्द पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशमुखांना राज्यसभेच्या जागेचे आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles