पालांदुरात अतिक्रमणासह अवैध बांधकामांना उधाण

पालांदुरात अतिक्रमणासह अवैध बांधकामांना उधाणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शासकीय भूखंडांवर बळजबरीने अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनाचे मौन का ?_

पालांदूर ( चौ ): हळूहळू का होईना पालांदुर गावाची लोकसंख्या सातत्याने वाढत चालली आहे . त्यातच अनेकांनी दुकाने व ईतर बांधकामांचा सपाटा लावला आहे . ही बांधकामे करतांना काहींनी तर चक्क शासकीय भूखंडांवर बळजबरीने अतिक्रमण देखील केल्याचे दिसते . त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून याबाबत कित्येक तोंडी व लेखी तक्रारींचा स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय पालांदुर व गटग्रामपंचायत कार्यालय कवलेवाडा येथे खितपत पडलेला असून स्थानिक ग्रा.पं. प्रशासन कसलीच कारवाई करीत नसल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला खच आहे .

पालांदूर व परीसरात फारसे उद्योग नसले तरी परिसरातील गावांमधील नागरीक , कामगार या ठिकाणी रोजगार व कामकाजाच्या शोधार्थ निवास करून राहायला येत असल्याने गावाच्या लोकसंख्येत नागरी वस्तीत दिवसेंदिवस भर पडत आहे तर दुसरीकडे गावाच्या आसपास असलेल्या शेतजमिनी अकृषक करून त्यावर बेकायदा भूखंड तयार करीत त्याची विक्री करून त्यावर पक्के बांधकाम करणेही सुरू आहे.

यात काही धनदांडग्यानी रिकाम्या भूखंडांवर तर काहींनी शासकीय गटांवर अतिक्रमण करून घराचे व्यवसायाकरीता बेकायदा दुकानखोल्यांचे बांधकाम केले आहेत व काहींचे तसे करणे सुरूच आहे . गावातून गेलेल्या मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गालगतच्या छोट्या नाल्यांवरती पक्के बांधकाम करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे . यात धनदांडग्यांसह व्यापारी सामान्य नागरिकांचा सामावेश आहे . यात काही मंडळी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत कारवाई टाळत असल्याचा आरोपही काही जाणकार नागरिकांनी केला आहे . ही समस्या तीव्र व गंभीर रूप धारण करण्यापूर्वी पालांदूर व कळलेवाडा ग्रा.पं. हद्दीतील अतिक्रमणे काढावीत अशी मागणीही येथील सुज्ञ नागरीकांनी केली आहे.

*रहदारीला अडचण*
दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत कित्येकांनी शासकीय भूखंडावर बळजबरीने रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे केल्याचे दिसते . हे अतिक्रमीत बांधकाम मुख्य रस्त्यालगतच केले असल्याने व रस्ता आधीच अरुंद असल्याने त्यात या बेकायदा बांधकामाची भर पडल्याने रहदारी करण्यास अडचणी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली ग्रा.पं. प्रशासनाने रस्त्यांचे सुनियोजितपणे योग्य मोजमाप करून ही अतिक्रमणे काढावी व रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“गट ग्रामपंचायत शासकीय जागांवर अतिक्रमण करण्यात आल्याने नागरीकांना त्रास होत आहेत . अतिक्रमण धारकांना मागील आठवड्यात नोटीस पाठवीली . कायदेशीर प्रक्रिया करणे सुरू आहे .”

_रवी टोपरे , सचिव गटग्रामपंचायत कार्यालय कवलेवाडा / मेंगापूर_

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles