Home ताज्या घटना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान; मीनाक्षी लेखी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान; मीनाक्षी लेखी

86

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान; मीनाक्षी लेखीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी यांनी आज नवी दिल्ली येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षासाठी राहिलेल्या 75 दिवसांच्या उलटगणतीला सुरू केली.सेंट्रल पार्क, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव श्री गोविंद मोहन, एनडीएमसीच्या सचिव श्रीमती ईशा खोसला आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि नवी दिल्ली नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांसह सामान्य नागरीकही उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीमती. मीनाक्षी लेखी म्हणाल्या, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतात जे काही उत्तम आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे आणि भारतातील विविधतेतील एकता दाखवता येणारी प्रत्येक गोष्ट साजरी करणे गरजेचे आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि ज्यांनी भारताला स्वतंत्र ठेवण्यासाठी योगदान दिले त्यांच्याकडे आपण सर्वांनी मार्गदर्शक प्रकाशदिवे या नात्याने पाहिले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

आज देशासाठी जगण्याची आणि त्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका डॉ.सुकृती माथूर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.