संदीप मेश्राम बसपाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष

संदीप मेश्राम बसपाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव नागपूर

मुंबई : बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून संदीप मेश्राम यांची छत्रपती शाहू जयंती दिनी 26 जून ला मुंबईच्या प्रदेश बैठकीत पुनर निवड करण्यात आली. संदीप मेश्राम (40) हे वाडी परिसरातील दाभा येथे राहतात. संदीप मेश्राम यांनी यापूर्वी पश्चिम विधानसभा महासचिव, पश्चिम विधानसभा अध्यक्ष, पश्चिम विधानसभा प्रभारी, नागपूर जिल्हा प्रभारी व नागपूर जिल्हा अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत.

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती ह्यांनी 26 ऑक्टोबर 2019 ला दिल्लीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड संदीप ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली त्याच वेळी संदीप मेश्राम यांची सुद्धा नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती.

दोन आठवड्यापूर्वी नागपूर जिल्हा व शहर बसपाची कार्यकारणी भंग करण्यात आली होती. परंतु बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रभारी प्रमोद रैना, नितीन सिंग, एड. सुनील डोंगरे व प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी नागपूर जिल्हाध्यक्ष पदावर संदीप मेश्राम यांची पुन्हा निवड केली.

त्यामुळे नागपुरातील प्रमुख कार्यकर्ते उत्तम शेवडे, अभिलेश वाहणे, महेश सहारे, चंद्रशेखर कांबळे, नितीन वंजारी, अमित सिंग, सदानंद जामगडे, योगेश लांजेवार, प्रवीण पाटील, सुनंदाताई नीतनवरे, सुरेंद्र डोंगरे, चंद्रमणी गजभिये, नवनीत धडाडे, प्रकाश फुले, सुमंत गणवीर, आदेश रामटेके, अभय डोंगरे, वीरेंद्र कापसे, मनोज निकाळजे, आशिष फुलझेले, शिवपाल नितनवरे, सुनील सोनटक्के, सुमित जांभुळकर, सचिन कुंभारे, संतोष तायडे (बुलढाणा) आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन भव्य स्वागत केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles