मुख्यमंत्री शिंदेच्या ‘पी ए’ची गुंडगीरी; सेनेच्या सहसंपर्क प्रमुखास धमकी

मुख्यमंत्री शिंदेच्या ‘पी ए’ची गुंडगीरी; सेनेच्या सहसंपर्क प्रमुखास धमकी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमख गुलाबराव वाघ यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जळगावात शिवसेनेतर्फे बंडखोरांच्या विरोधात भव्य आक्रोश मोर्चा सुरू असतांना ही धमकी आली, असल्याचे वाघ यांनी सांगितले.

शिवसेनेतर्फे जळगाव येथे आज बंडखोर आमदारांच्या विरोधात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहपौर कुलभूषण पाटील, महापालिकेचे शिवसेना गटनेते नितीन लढ्ढा, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे आदी नेते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा निघत असतांनाच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना धमकीचा फोन आला, आपण एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बोलत असून आपण त्यांच्या विरोधात का आंदोलन करीत असतात, आपण जीथे दिसाल तेथे तुम्हाला मारू अशी त्यांने फोनवरून धमकी दिल्याचे वाघ यांनी सांगितले. आपण मोर्चात असल्यामुळे त्याचा फोन रेकॉर्ड केला नाही. या प्रकरणी आपण पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले. या वेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यानी या धमकीचा निषेध केला आहे. आम्हाला धमक्या देवू नका असा त्यांनी ईशाराच दिला आहे. शिंदे यांच्या स्वीयसहाय्यकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles