रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं

रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: विधानपरिषद निवडणूक निकालानंतर नाराज झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतमध्ये गेले आणि तिथून हे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामाला गेले. त्यानंतर हे आमदार ‘रेडिसन ब्लू’ या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर हे आमदार सध्या गोवा येथे आहेत मात्र, ‘रेडिसन ब्लू’ हॉटलचे संपूर्ण बिल एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार गुवाहाटी येथील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्कामाला होते. बुधवारी या आमदारांनी चेक आऊट करताच या सर्वांनी हॉटेलचे बिलं दिल्याची माहिती एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितली. ही रक्कम ६८ ते ७० लाख रुपये असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

बंडखोर आमदारांच्या वास्तव्यासाठी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलची निवड करण्यात आली होती. हॉटेल बुकिंगवेळी हॉटेलच्या सर्व ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. तसेच हॉटेलचे रेस्टॉरंट आणि इतर सुविधा बाहेरील लोकांसाठी २२ ते २९ जून या कालावधीत संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या सर्व आमदारांनी हॉटेल आणि जेवणाचं बील भरल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्याने दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles