छावा क्षात्रवीर सेना मारेगावतर्फे वृक्षारोपण

छावा क्षात्रवीर सेना मारेगावतर्फे वृक्षारोपण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी प्रतिनिधी

मारेगाव: येथील छावा क्षात्रवीर सेना महा राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान दादा सुरवसे यांच्या सूचनेनुसार राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मारेगाव येथील पोलीस निरीक्षक मा राजेश पुरी साहेब, प्रदेशाध्यक्ष मा अनिल पारखी, व जिल्हापरिषद सदस्य मा अनिल देरकर, पंचायत समिती सदस्य सौ पोटे ताई ,नगर सेवक अनिल गेडाम ,नगरसेविकास अंजमु नबी शेख ,नगरसेवक श्री नंदू आसुटकर यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

ठाणेदार राजेश पुरी साहेबांनी आपल्या भाषणात साहेबांनी छावा क्षात्रवीर सेनेची स्तुती केली अशा प्रकारे सामाजिक संघटनाने सामाजिक क्षेत्रात जर काम केले तर,अनेक गोर गरीब दीन दुबळ्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल अशाच प्रकारे कार्य करा जे काही मदत करायची आहे ते देऊ असे आश्वासन दिले.

छावा क्षात्रवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ पारखी, नागपूर ह्या कार्यक्रमात हजर झाले. त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यामागचे कारण दोन वर्ष कोरोना आजारात गेले अनेक लोकांच्या ह्या आजाराने ऑक्सीजनमुळे जीवनज्योत मावळ्ल्या आणि छावा क्षात्रविर सेना यवतमाळ मधील जनतेच्या समस्या सोडविण्या साठी कट्टीबद्ध राहू लोकांच्या मदतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करु.

मारेगाव येथील सरकारी कार्यलयात व नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचार होत आहे सफाई कामगार यांच्यावर अन्याय होत लवकरच आमचे पदाधिकारी आवाज
उचलतील असे मत प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ पारखी यांनी व्यक्त केले. महिला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा ताई तातेड यांनी मारेगाव येथील जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवू व छावा क्षात्रवीर सेना कशी वाढेल यासाठी सुध्दा प्रयत्न करू असे आश्वासन आपल्या भाषणात दिले व जिल्हा अध्यक्ष श्री राजू भाऊ जूनगरी यांनी कार्यक्रमाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली.

महिला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा ताई तातेड , विदर्भ अध्यक्ष विलास भाऊ बुराण ,जिल्हाध्यक्ष राजू भाऊ जूनगरी, तालुका अध्यक्ष अनंता भाऊ घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सोशल मीडिया विदर्भ प्रमुख श्री प्रेम कुमार गाडगे नागपूर जिल्हा अध्यक्ष विठोबा घुरडे ग्रामीण , भंडारा जिल्हा अध्यक्ष पंकज खेडीकर,जिल्हा संपर्क प्रमुख भंडारा श्री अभिजित शोमकुवर जिल्हा उपाध्यक्ष अजय धांडे महिला तालुका अध्यक्ष मंजुषा ताई पेंदोर , आदेश तातेड विद्यार्थी सेना जिल्हा अभीषेक उपरे,वी जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज घोटेकर,वी तालुका अध्यक्ष अजय लांबट,वी तालुका उपाध्यक्ष संकेत लांबट सौ शुभांगी कुक्कलवार शेख, शरिफा, शेख इसूब, शेख इज आकाश पारोधी, देवानंद तुमराम , राम चांदेकर, कैलास खाडे,रामभाऊ उपरे कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles