उमेश कोल्हे हत्याकांडातील सूत्रधार इरफान खानला नागपुरात अटक

उमेश कोल्हे हत्याकांडातील सूत्रधार इरफान खानला नागपुरात अटकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमरावती: संपूर्ण देशात खळबळ माजवणा-या महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपीला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे. इरफान खान हा या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे. इरफान खान एक एनजीओ चालवतो. इरफान खानला नागपुरातून अटक करण्यात आली आहे.

नुपूर शर्माच्या टीकेच्या समर्थनावर, केमिस्टला मारण्याची संपूर्ण योजना इरफान खानने रचली होती आणि खुनाचे निर्देश दिले होते. अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षक नीलिमा अराज यांनी सांगितले की, उमेश कोल्हे खूनप्रकरणी नागपुरातून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

केमिस्ट उमेश कोल्हे (५४) यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येच्या आठवडाभर आधी ही घटना घडली होती.

अमरावती शहर कोतवालीच्या अधिकाऱ्यांनी माहितीनुसार, उमेश कोल्हे हे अमरावती शहरात मेडिकल स्टोअर चालवायचे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हाट्सअँप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने चुकून एका ग्रुपमध्ये पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये काही मुस्लिम सदस्य देखील होते. त्यांनतर मुख्य आरोपी इरफान खान याने उमेशच्या हत्येची योजना आखली होती आणि त्यासाठी लोकांना सहभागी करून घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले. इरफान खानने इतर पाच आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि पळून जाण्यासाठी एक कार देण्याचे आश्वासन दिले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles