सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्र्यांचे उद्या नागपुरात आगमन

सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्र्यांचे उद्या नागपुरात आगमन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच उद्या ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता नागपुरात येणार आहे. शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालवली असून अवघे शहर भगवे होणार असल्याची चर्चा आहे.

प्रवीण दटके व संदीप जोशी यांनी काल बैठक घेऊन भाजपच्या (BJP) नागपूर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या आयोजनाची माहिती दिली आणि आवश्‍यक सूचना केल्या. यावेळी आमदार दटके म्हणाले की, उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेडगेवार चौकातील स्मारकावर ते माल्यार्पण करतील. त्यानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरमपेठेतील फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या त्रिकोणी पार्कपर्यंत स्कूटर आणि कार रॅली काढण्यात येणार आहे.

हेडगेवार चौक तो त्रिकोणी पार्क या मार्गात येणाऱ्या सर्व चौकांमध्ये, विशेष करून छत्रपती चौक, प्रताप नगर चौक, लक्ष्मी भवन चौकात कार्यकर्त्यांना त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. प्रदेश प्रवक्ते, पॅनलीस्ट चंदन गोस्वामी माहिती देताना म्हणाले की, रॅलीमध्ये फडणवीस यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार शहर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार रामदास आंबटकर, आमदार समीर मेघे, आमदार टेकचंद सावरकर राहणार आहेत.

जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर संदीप जोशी, प्रदेश आणि विदर्भाचे संघटन उपेंद्र कोठेकर प्रदेष उपाध्यक्ष संजय भेंडे, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, नीता ठाकरे, शिवानी दाणी वखरे, महामंत्री संजय बंगाले, राम आंबुलकर, बाल्या बोरकर, सुनील मित्रा, भोजराज डुंबे, राजेश हातीबेड, परशु ठाकूर, किशोर वानखेडे, देवेन दस्तुरे, संजय अवचट, संजय चौधरी, विनोद कन्हेर, किशोर पलांदूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी होणार असल्याचेही चंदन गोस्वामी यांनी प्रसार माध्यमास सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles