‘दुनिया में सारे शोक पाले नही जाते, काच के खिलोने हवा में उछाले नही जाते’; देवेंद्र फडणवीस

‘दुनिया में सारे शोक पाले नही जाते, काच के खिलोने हवा में उछाले नही जाते’; देवेंद्र फडणवीसपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’ईडी’च्या भीतीमुळेच ऐवढे आमदार आमच्याकडे आले_

मुंबई : ‘मी पुन्हा येईन’, असं म्हटलं होतं, त्यावर माझी राज्यात खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे आणि एकटा नाही आलो तर सगळ्यांना घेऊन आलो आहे. मी सगळ्यांचा आता बदला घेणार आणि बदला आहे की मी त्यांना माफ केले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसता. प्रत्येकाचा मौका येत येत असतो. ‘दुनिया में सारे शोक पाले नही जाते, काच के खिलोने हवा में उछाले नही जाते, सारे काम तक्कदीर भरोसे टाले नही जाते’ अशी शायरी म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.

आज झालेल्या बहुमत चाचणीमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीला केवळ ९९ मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. यानंतर सभागृहामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारकीर्द सांगत त्यांचं कौतुक केलं. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचं सामान्य नागरिकासोबतचं नातं आणि कामासाठीची तळमळ याबाबत फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं.

बहुमत चाचणीसाठी मतदान सुरू असताना विरोधी पक्षातील आमदार ईडी असं ओरडताना दिसले. यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, आता आपण सगळे राजकीय विरोधक आहोत. सगळे मित्र आहोत. हे सगळे ईडीच्या भीतीमुळेच आले आहे. मात्र ही ईडी म्हणजे, एकनाथ आणि देवेंद्र आहे, असंही फडणवीस म्हणाले. यानंतर समर्थक आमदारांनीही याला आपली सहमती दर्शवली.

शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक केलं. ‘एकनाथ शिंदे यांचे सरकार आता आले आहे. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एकनाथ शिंदे हे रसायन वेगळे आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles