Home ताज्या घटना सिद्धनेर्ली आजी –माजी सैनिक संघटनेकडून अंबरिषसिंह घाटगे यांचा सत्कार

सिद्धनेर्ली आजी –माजी सैनिक संघटनेकडून अंबरिषसिंह घाटगे यांचा सत्कार

69

सिद्धनेर्ली आजी –माजी सैनिक संघटनेकडून अंबरिषसिंह घाटगे यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)

कोल्हापूर: सिद्धनेर्ली ता.कागल येथील श्री सिद्धेश्वर कृपा आजी-माजी सैनिक संघटनेच्या मागणीनुसार सिद्धनेर्ली येथे सैनिकभवन उभारणीसाठी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. शिवाय सैनिक भवनच्या कंपाऊंड बांधण्यासाठी गोकुळचे संचालक, माजी जि.प. सदस्य अंबरिषसिंह घाटगे यांनी आपल्या जि.प.फंडातून भक्कम निधी उपलब्ध करून सदर सैनिक कंपाऊंडचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून सिद्धेश्वर आजी –माजी सैनिक संघटनेमार्फत अध्यक्ष अॅननरी कॅप्टन लक्ष्मण पाटील,उपाध्यक्ष विलास पाटील यांचे हस्ते माजी जि.प.सदस्य अंबरिषसिंह घाटगे यांचा अन्नपुर्णा शुगर केनवडे कारखाना कार्यस्थळावर गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात, हे देशाच्या सैन्य दलांतील सैनिकांकडून शिकावे. देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फार मोठे आहे. हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत. देशाच्या या खऱ्या संपत्तीचा येणाऱ्या प्रत्येक पिढीने आदर, मानसन्मान ठेवला पाहिजे असे गौरवउदगार त्यांनी सैनिकांबद्दल व्यक्त केले.

कार्यक्रमास आजी-माजी सैनिक संघटनेचे दगडू पाटील,लक्ष्मण पोवार,रामचंद्र पाटील,पांडूरंग जगताप, बयाजी निकम,बंडा माने, एस.के.पाटील, संपत माने, संभाजी निकम उपस्थित होते. स्वागत बंडा संकपाळ यांनी केले, तर आभार बाळीशा मगदूम यांनी मानले.