
मानेवाडा परिसरात गाई चोरण्याचा प्रयत्न फसला
नागपूर: कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल केला असून घरासमोरून तीन गाई चोरीला गेल्या या संदर्भात माहिती प्राप्त होताच अनेक दिवसापासून गाई चोरण्याचे षडयंत्र चोरट्यांनी रचल्या गेले आहेत. असे लक्षात येताच काही दिवसा पूर्वी मानेवाडा परिसरातील सरस्वती नगरात बुद्ध विवाहाराच्या मागच्या बाजूला गायी चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रिय आहे.
गाई चोरी करतात तेही रात्रीच्या ३ ते ५ च्या दरम्यान आठ दिवसा पुर्वी बुद्ध विहाराच्या मागे काही अज्ञात चोरटे मोठी गाडी घेऊन आले असता इकडे, तिकडे बघताच बसलेल्या गाईला उचलून त्याच्या गाडीमध्ये ढकल-ढाकल करून कोंबण्याचा प्रयत्न करित गाडीत भरतात व चोरून नेतात. असा प्रकार निदर्शनात आलेला आहेत. कृपया वस्तीतील नागरिकांनी लक्षपूर्वकता असं काही असल्यास पोलीस स्टेशनला फोन लावून कळवावे व पोलीसांना मदत करावी. आणि आजूबाजूच्या व्यक्तींना फोन करून माहिती द्यावी. हेच आपले कर्तव्य आहे व सतकर्ता बाळगावी.
मोकाट जनावरे ज्या कोणत्या मालकांची असतील त्यांनी आपल्या घरातच बांधून ठेवावे अन्यथा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.