शारीरिक शिक्षण शिक्षक झाला हद्दपार
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर: नविन नेमणूकी मधुन केंद्रीय सरकार द्वारा बालकांचा मोफत व सक्तीचा १८/०६/२०१० च्या शासन निर्णयाचा मागिल बि.जे.पी. महाराष्ट्र राज्य सरकारने चुकीचा अर्थ काढून शालेय शिक्षण प्रणाली मधून कला, शारीरिक शिक्षण(क्रीड़ा) व संगीत विषयाच्या अध्यापना करीता दि.२८/०८/२०१५ च्या महाराष्ट्र शासन निर्णयान्वये “संचमान्यता व पदांबाबत” सुधारीत निकष निश्चित करून वर्ग ६ वी थे ८ वी करीता मुख्य विषय म्हणून पुढील प्रमाणे निश्चित केले आहे.
विज्ञान,गणित,भाषा व समाजशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.परंतु “कला, क्रीडा शिक्षक, कला,व संगीत या विषयांचा समावेश करण्यात आलेला नाही. याकारणाने उपरोक्त पत्रावरून शालेय शिक्षण विभागाने नविन शा.शिक्षण शिक्षकांची नेमणूक अपात्र ठरविण्यात आलेली आहे.
जेव्हा की दि.२५/०२/२०१९”शासन निर्णय”अनुसार माध्यमिक स्तरावर नवीन सुधारित तासिका भारांश (फक्त शारीरिक शिक्षण ३६ तासिका), शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक अहर्ता निश्चित केलेली आहे. ज्याकरीता वर्ग ९ व १० वी करीता प्रत्येकी ६ तुकड्यांची आवश्यकता आहे.जी सध्या स्थितीमध्ये शक्य नाही.