मान संस्कृतीचा

मान संस्कृतीचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“जिथे सागरा धरणी मिळते,
तिथे तुझी मी वाट पाहते..”

गाणं आठवलं.. उगीचच अर्थ शोधण्याच्या मागे लागले. शब्दशः अर्थ घेतला तर खरच हे शक्य आहे का.? खरं तर आपल्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत की, त्या शक्य नाही. कधी घडणारही नाही, तरी आपण त्या खऱ्या मानतोच ना! तसच आहे सार काही……

देवाचिये दारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या’

देवाचे दार आहे का? नास्तिक म्हणणारा समाज देखील याकडे वळतोच ना ! ‘जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा’
म्हणजे इथे दुसरा जन्म आहेच ना ! हे जर आपल्याला मान्य आहे तर. वटपौर्णिमा का नाही? व्हाट्सअप, रेडिओ अगदी दूरदर्शनवर देखील वटपौर्णिमा या विषयावर जसे सकारात्मक पर्यावरणात्मक लेख सुंदर कलात्मक शब्द सौंदर्याने सजवलेले गेलेले लेख वाचले, ऐकले. आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे या सणापासून सण साजरे करणाऱ्या स्त्रियांपासून, ज्यांच्यासाठी हा सण साजरा करतात त्यांच्या पर्यंत सर्वांची चेष्टा केली गेली. हे ही अनुभवले. अर्थात हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच.

आज आपण सुशिक्षित झालो आहोत. परंतु आपल्याच घरातील मागच्या पिढयांनी हे सण साजरे केलेत ना? मग आजच आक्षेप! बरं आक्षेपही असावा… पण त्याची चेष्टा होईल इतका नसावा. ‘गुढीपाडवा’ हिंदू कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षातील पहिला सण. अगदी शतकानुशतके हा सण आपण साजरा करतो. यालाही आध्यात्मिक सांस्कृतिक आधार आहे. परंतु अलीकडच्या काळात, मात्र पुन्हा ऐतिहासिक सामाजिक दाखले देत या सणाविषयी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. दसरा, ‘ दिवाळी’ यासारखे सण सोडले तर, प्रत्येक सणांवरवर हल्ली काही ना काही शंका घेतल्या जातात. खिल्ली उडवली जाते. त्यामुळे आपल्या धर्माची अस्मिता लोप पावते की काय असा प्रश्न क्षणभर मनात येऊन जातो.

जन्म-मरण, स्वर्ग-नरक, आत्मा -शरीर या बाबतीतही असेच घडते. पुनर्जन्म आहे का? माणूस मेल्यानंतर स्वर्गात जातो की नरकात..? पाप करणारे नरकात नि पुण्य करणारे स्वर्गात… ! हसण्या सारख्या वाटतात ना या साऱ्या गोष्टी. माणूस मेल्यानंतर आत्मा निघून जातो. तृप्त झालेल्या आत्म्याला मोक्ष मिळतो. अतृप्त आत्मा लटकत राहतो.
मृत्यू समयी यम येतो आणि माणसाला घेऊन जातो. ही यम देवता खरी की खोटी. माझ्या मते प्रत्येकाने आपलं मत अवश्य मांडाव. पण शब्द वांझ होतील इतकी उगीचच त्या शब्दांची त्यातून निर्माण होणार्‍या आशयाचा ऊहापोह करणं अगदीच निरर्थक. आपणच आपल्या चेष्टेचा विषय होतं आहोत. जग बदललय. विज्ञान तंत्रज्ञान आले… त्याने प्रगती केली. पण ‘जुनं ते सोनं’ म्हणत काही गोष्टी चालत आल्या आहेत. त्याने जर कोणाचं नुकसान होत नसेल तर आपणही तटस्थ राहायला कुणाची हरकत नसावी.

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles