शिक्षण आणि डोनेशन !

शिक्षण आणि डोनेशन !



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

नागपूर :- शिक्षणाचे आकर्षण वाढले.पण सरकारमधे चोर शिरल्याने सरकारी शाळांवरील नियंत्रण राहिले नाही.म्हणून खाजगी शिक्षण संस्था मैदानात उतरल्या.खाजगी शाळांचे व्यवस्थापन चांगले असल्याने पालकांनी तिकडे धाव घेतली. आ फी, डोनेशन वगैरे देऊन मुले खाजगी शाळेत घातली.मुलांना खाजगी शाळेत प्रवेश घेतांना पालक कोणतीही अट मान्य करतात.मागितले तितके पैसे फी व डोनेशन म्हणून मोजतात.अगदी अंधारात, कोपऱ्यात.ते ही चेयरमन किंवा एचएम ला न देता सिपाई किंवा भलत्या सलत्या असंबद्ध माणसाच्या माध्यमातून देतात.यात पालक आणि संस्थाचालक यांचा आपसातील सौदा असतो.कधीकधी तर मध्यस्थ,एजंट सुद्धा मदत करतो.
खाजगी शाळेत प्रवेश देतांना संस्थाचालक मुलांसोबत पालकांचीही मुलाखत घेतात.नको तितके नाचवून घेतात.तेंव्हा पालक हूं कि चूं करीत नाहीत.कारण त्यांना त्यांचा पाल्य इतरांपेक्षा वरचढ शिकवायचा असतो.त्याला इंग्लंड अमेरिका पाठवायचा असतो.म्हणून ते सर्वच नको ते अत्याचार सहन करतात.तेथे त्यांचा स्वाभिमान दुखावला जात नाही.हेडसांड, अपमान ,माकड होत असले तरी आक्षेप घेत नाहीत.इतके अगतिक झालेले असतात कि कपडे उतरवून नाचायला लावले तरी पालक नाचतील.असे सर्व अपमान,शोषण सहन करून लग्न,मौत मधे वर मान करून सांगायला बरे,कि आमचा बंटी आणि बबली इंग्लीश मेडियम ला आहे.कन्व्हेंट ला आहे.सेमी ला आहे.सीबीएससी वगैरे काय काय बढाई मारतात.ऐकणारा उबगतो.पण नात्यात,मैत्रीत दुरावा येऊ नये म्हणून सहन करावे लागते.पालकांनी इतके सहन केले आहे तर आपणही त्यांचे ऐकून सहन करून त्याचे दुख हलके करतो.

पालकांनी इतके अन्याय, अत्याचार,शोषण मान्य करून घेतले तर नंतर रडणे,कण्हणे सुद्धा करू नये.तरीही काही पालक तक्रार करतात.काहो, आमच्याकडून डोनेशन घेतले.आणि पावती दिली नाही.का दिली नाही? तुम्ही का घेतली नाही?पैसै तुम्ही गुपचूप देऊन येणार आणि पावती दुसरा कोणी आणून देणार का?पैसे दिले तर डोनेशन ची पावती घ्या.नसेल पावती देत तर नका देऊ डोनेशन.सरकारी शाळेत घाला पोरांना.तेथे नियंत्रण ठेवा,मास्तरवर.शिक्षीत आणि उच्चशिक्षित लोकांनी सरकारी शाळा नाकारून खाजगी शाळांकडे मुले घातली.तर आता मोल मजूरी करणारा सुद्धा त्यांच्या मागे धावत आहे.परवडत नसले तरी डोनेशन देत आहेत.अशा शाळा गावापासून दूर असतात.त्यांचा प्रवास खर्च वेगळा.पुस्तके, युनिफॉर्म चा खर्च वेगळा.घरात कोणी मराठी बोलत नाही आणि पोरगं इंग्रजी शाळेत.

सरकार हेच खाजगीकरण करीत आहे.अशी बोंब मारणारी माणसे सूद्धा खाजगीकरण कडे वळत आहे.खाजगी शाळा हवी.खाजगी दवाखाना हवा.खाजगी बॅंक हवी.पतपेढी हवी.बुडाली ,बुडवली तरी चालेल.खाजगी वाहन हवे.तर मग सरकार सुद्धा तेच तर करीत आहे.सामान्य माणसांचा कल खाजगीकरणाकडे जास्त आहे.म्हणून सरकार सुद्धा सरकारी संस्था खाजगी उद्योपतींना विकून मोकळे होत आहे.यथा प्रजा तथा राजा.

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती ला न विकता खाजगी व्यापारी ला विकला.त्या व्यापाऱ्यांनी माल घेतला,विकला आणि पैसे न देता पोबारा केला.भाजप सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती चे नियंत्रण उठवले.पंजाब, हरियाणा च्या शेतकऱ्यांना आवडले नाही.त्यांनी आंदोलन केले.प्राण गमावले. कायदे रद्द करवून घेतले.त्या उलट चा मार्ग पाचोरा किंवा अन्य ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी अवलंबला.फसवणूक झाली.अशीच फसवणूक शिक्षणाबाबत पालक करून घेत आहेत.सरकारने सरकारी शाळा पुर्ण बंद केल्या तर मोफत शिक्षण बंद होईल.जळगांव जिल्ह्यातील अनेक आमदारांनी , खासदारांनी स्वताच्या खाजगी शाळा सुरू केल्या आहेत.सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.हे आमदार खासदार जनतेशी प्रामाणिक नाहीत.ते संधीसाधू आहेत.विश्वासघातकी आहेत.ज्या माणसाकडे एक जरी खाजगी संस्था असली तरी तो लोकप्रतिनिधी बनण्यास नालायक असतो.त्याचा कल सेवा ऐवजी मेवा कडे असतो.सरकारकमधून चोरी करणे आणि स्वताचे घबाड भरणे हाच त्याचा हेतु असतो.अशी नालायक माणसे पुन्हा आमदार खासदार निवडून देणे ही मतदारांची चूक आहे.असे मत महाराष्ट्र जागृत जनमंच जळगावचे शिवराम पाटील यांनी प्रसिद्धी करीता सादर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles